चांगली प्रतिकारशक्ती कोरोनावर करते मात; ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांचे संशोधन
चांगली प्रतिकारशक्ती कोरोनावर करते मात; ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांचे संशोधन 
मुख्य बातम्या

चांगली प्रतिकारशक्ती कोरोनावर करते मात; ऑस्ट्रेलियातील अभ्यासकांचे संशोधन

वृत्तसेवा

मेलबर्न : कोरोनाव्हायरसच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियातील संशोधकांकडे एक चांगली बातमी आहे. ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या पहिल्या रुग्णाच्या शरिरातील प्रतिकारशक्तीने या संसर्गाचा कशा प्रकारे मुकाबला केला याचा अभ्यास संशोधकांनी केला आहे. मानवी शरिरातील प्रतिकारशक्ती या विषाणूचा प्रतिकार करण्यास सक्षम असल्याचे संशोधकांना आढळून आले आहे. तसेच, चांगली प्रतिकारशक्ती असेल तर रुग्ण तीन दिवसांत बरा होऊ शकतो, अशी नवी माहिती या अभ्यासातून पुढे आली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गाने जगभरात कहर केला आहे. त्यामुळे या विषाणूवर औषध शोधण्यासाठी अनेक देशांमधील संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. अशाच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ऑस्ट्रेलियातील पीटर डोहेर्टी इंस्टिट्यूट फॉर इन्फेक्शन ऑंड इम्युनिटी या संस्थेतील संशोधकांनी ऑस्ट्रेलियातील कोरोनाच्या रुग्णाचा अभ्यास केला. मेलबर्न विद्यापीठ आणि रॉयल मेलबर्न रुग्णालय यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हे संशोधन करण्यात आले. ऑस्ट्रेलियातील पहिल्या रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्यानंतर या विषाणूच्या संसर्गाला रुग्णाच्या शरिरातील प्रतिकारशक्ती कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा अभ्यास संशोधकांनी केला. निरोगी असलेल्या ४० वर्षांच्या महिलेत कोरोनाची अल्प ते मध्यम स्वरुपाची लक्षणे आढळून आल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या रुग्णाच्या रक्ताचे चार वेगवेगळ्या वेळी नमूने घेण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर तीन दिवसांनी दिसून आले की रुग्णाच्या शरिरातील प्रतिकारक्षम पेशींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. शीतज्वर झालेल्या रुग्णाच्या शरिरातही अशाच प्रकारची प्रक्रिया घडून येते. सामान्यपणे हे रुग्ण बरा होण्याचे लक्षण मानले जाते. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर संबंधित रुग्ण तीन दिवसांत बरा होईल अशी शक्यता आम्ही वर्तविली होती, जी संबंधित रुग्णाच्या बाबत खरी ठरल्याचे दिसून आले, अशी माहिती डॉ. ओआन्ह न्युयेन यांनी दिली. कोरोनाच्या विरोधातील लस शोधण्यासाठी संशोधकांना या अभ्यासाची मोलाची मदत होणार आहे. मृत्यूचे कोडे उलगडणार?

  • कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू कशामुळे होते हे शोधण्यासाठी हा अभ्यास महत्वाचा ठरणार आहे
  • कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या शरिरात नेमकी काय कमतरता होती हे शोधता येणार
  • कोरोनाच्या ८० टक्के रुग्णांमध्ये अल्प ते मध्यम स्वरुपाची लक्षणे दिसतात, या रुग्णांमधील प्रतिकारशक्तीचा प्रतिसादाचा अभ्यास ठरणार कळीचा मुद्दा
  • नेचर मेडिसिन नियतकालिकात हे संशोधन नुकतेच प्रसिद्ध झाले आहे
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

    APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

    Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

    Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

    Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

    SCROLL FOR NEXT