Agriculture department akola raids : अकोल्यातील कृषी विभागाच्या पथकाने टाकलेल्या वादग्रस्त धाडीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा पीए असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे नव्या वादात सापडलेल्या सत्तार यांनी अखेर स्पष्टीकरण दिले. दीपक आपला पीए नसल्याचा पुनरूच्चार करत तो कृषी अधिकारी असल्याचे कृषिमंत्र्यांनी आज प्रसारमाध्यमांसमोर सांगितले.
कृषी विभागाच्या भरारी पथकाने अकोला शहरातील एमआयडीसीमध्ये धाडी टाकली. मात्र, या पथकात अधिकार नसलेल्या अनेक खासगी व्यक्तींचा समावेश असल्याची बाब समोर आली होती. तसेच या पथकातील कृषीमंत्री अब्दुल सत्तारांचा स्विय सहायक दीपक गवळी याने संबंधित खत कंपनीच्या व्यवस्थापकाकडे पैशाची मागणी केल्याची तक्रार करण्यात आल्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले होते.
यांसदर्भात कृषिमंत्री सत्तार म्हणाले, बोगस बियाणे विकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी राज्य शासनाने एक पथक तयार केले होते. या पथकामध्ये ६२ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. यात अधिकाऱ्यांमध्ये दीपक गवळीचाही समावेश होता.
या पथकाने राज्यभरात छापे कारवाई केली. यामध्ये २६९ दुकानांमध्ये संशयस्पद बियाणे, खते आणि किटकनाशके आढळून आली. त्यांचे नमूने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. दोषी आढळणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
अकोल्यात खत व्यवस्थापकाने केलेल्या तक्रारीनुसार संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर इथून पुढे कोणत्याही शेतकऱ्याने खत विक्रेते आणि कृषी अधिकाऱ्याविरोधात तक्रार केल्यास त्याची खुली (ओपन) चौकशी करण्यात येईल, असे कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.