मिरजोळे आणि नाचणेच्या ग्रामदेवतांची रत्नागिरीच्या बारावाड्याचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भैरी मंदिरात झालेल्या भेटीचा क्षण.
मिरजोळे आणि नाचणेच्या ग्रामदेवतांची रत्नागिरीच्या बारावाड्याचा देव म्हणून प्रसिद्ध असलेल्या भैरी मंदिरात झालेल्या भेटीचा क्षण. 
मुख्य बातम्या

कोकणात शिमगोत्सवाची धूम

टीम अॅग्रोवन

रत्नागिरी  ः ‘हुरा रे हुरा आणि आमच्या ग्रामदेवतेचा सोन्याचा तुरा रे होलिओऽऽऽ’ अशा फाका देत कोकणात शिमगोत्सव साजरा केला जात आहे. आंबा, सुरमाड, पोफळीसह करजांची होळी करून ती जाळण्याची प्रथा आजही कायम आहे. या सणासाठी हजारो चाकरमानी मुंबईहून कोकणात दाखल झाले आहेत. तिखटा आणि गोडा असा दोन्हीचा संगम या शिमग्यात साधला जातो. ग्रामदेवतांच्या सजलेल्या पालख्या घराघरांमध्ये दर्शनासाठी आणल्या जात आहेत.

कोकणातील चारही जिल्ह्यांत शिमगोत्सव हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. रत्नागिरी जिल्ह्यात तो एका वेगळ्या पद्धतीने साजरा होतो. फाल्गुन महिन्याचे शुक्ल पक्षाचे पंचमी म्हणजेच ‘फाकपंचमी’ला शिमगोत्सव सुरू होतो. शिमगा सणातील महत्त्वाचे कार्यक्रम म्हणजे फाकपंचमीला फोकट होळी उभी करून तिचा दररोज रात्री होम केला जातो. सोमवारी (ता. ९) रात्री बहुतांश गावांमध्ये होळी आणून होम केले जातात. होळीसाठी शेवर, आंबा, सुपारी आदी झाडांचा वापर केला जातो. शेवरीच्या झाडाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. होम करण्यासाठी गवत, कवळ, काडीकचरा, शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जातो.

‘हुरा रे हुरा’ आणि ‘आमच्या ग्रामदेवतेचा सोन्याचा तुरा रे होलिओऽऽऽ’ अशा फाका किंवा एखाद्याच्या अवगुणांवरही फाकांनी गावातील वातावरणात वेगळाचा रंग भरला जात आहे. कामानिमित्त परजिल्ह्यात राहणारे अनेक चाकरमानी रविवारी कोकणात दाखल झाले आहेत. शिमगोत्सवात ग्रामदेवतेची पालखी सजवली जाते म्हणजे रूपे लावली जातात. होळीचा होम झाल्यानंतर पालख्या गावोगावी फिरवण्यात येतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT