सिंदखेड गावात घरोघरी होमिओपॅथी औषधाचे वितरण केले जात आहे.
सिंदखेड गावात घरोघरी होमिओपॅथी औषधाचे वितरण केले जात आहे. 
मुख्य बातम्या

सिंदखेड ग्रामस्थांना होमिओपॅथी औषधाचे वाटप

टीम अॅग्रोवन

अकोला  ः ‘कोरोना’चा वाढता प्रादूर्भाव सध्या चिंतेचा विषय आहे. गाव- खेड्यांमध्ये ‘कोरोना’चा शिरकाव होत आहे. ‘कोरोना’वर औषध उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे. आयुष मंत्रालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोना या संसर्गजन्य आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून आर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होतो, असे नमूद करण्यात आल्याने स्मार्ट ग्राम सिंदखेडमधील (ता. मोताळा जि.बुलडाणा) प्रत्येक कुटुंबाला हे औषध देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे. याची अंमलबजावणीसुद्धा सुरु केली आहे.

ग्राम सामाजिक परिवर्तन आभियानात कार्यरत असलेल्या सिंदखेड येथे सरपंच विमल अर्जुन कदम या ग्रामस्थांच्या साथीने कार्य करीत आहेत. सिंदखेड ग्रामपंचायत आयएसओ प्रमाणित तसेच स्मार्ट ग्राम घोषित झाली आहे. सिंदखेड ग्रामपंचायत, स्वयंसेवक तसेच ग्रामस्थ एक जुटीने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कार्य करीत आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर आर्सेनिक अल्बम औषध रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे गावाने हे औषध गावातील 2600 लोकांना ग्रामवर्गणीतून मोफत देण्याचा निर्णय घेतला. सर्व वयोगटतील व्यक्तींना हे औषध दिले जात आहे. डॉ. अतुल पिंप्रीकर, डॉ. अनंता घानोकर यांच्या मार्गदर्शनात प्रवीण वैराळकर, ग्रामपंचायत उपसरपंच अशोक माळेकर, सचिव राजेंद्र वैरलकर, सदस्य प्रवीण जाधव, राजू भुसारी तसेच अंगणवाडी सेविका शुभांगी मोरे, माजी उपसरपंच ज्योती मोरे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेवराव गडाख, पदमाकर अलोने, पवन म्हस्के, प्रकाश लवांडे आदी हे काम करीत आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT