आरोग्य मंत्री राजेश टोपे
आरोग्य मंत्री राजेश टोपे 
मुख्य बातम्या

नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांसाठी सुविधा द्या : राजेश टोपे

टीम अॅग्रोवन

मुंबई : नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती याठिकाणी कोरोनाबाबत चाचण्यांसाठी परवानगी द्यावी, पीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे, रॅपिड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करावे, तसेच त्यासाठी आवश्यक कीट उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन  यांच्याकडे केली.

‘कोरोना’बाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी शुक्रवारी (ता.१०) व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव डॉ, प्रदीप व्यास, साथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.  

श्री. टोपे म्हणाले, की महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईमधील रुग्णांची वाढ चिंताजनक असून त्यावर राज्य शासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. राज्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किटस्, एन ९५ मास्क याबाबत केंद्र शासनाकडे मागणी यापूर्वीच नोंदविली असून हे सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिल्यास त्याचे वितरण राज्यभरात करणे सोयीचे होईल. देश, राज्यात ज्या पीपीई किटस् उत्पादक कंपन्या आहेत त्यांचे प्रमाणीकरण जलदगतीने करावे . जेणे करून त्यांना उत्पादन करणे शक्य होईल. रॅपिड चाचणी कधी करायची या बाबतीत केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचनांसोबतच त्यासाठी लागणारे किटस् देखील उपलब्ध करून द्यावेत, असे त्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

Agriculture Drone : ‘वनामकृवि’मध्ये कृषी ड्रोन तंत्रज्ञान प्रमाणपत्र अभ्यासक्रम

Cotton Cultivation : आठ राज्यांत अतिसघन कापूस लागवड प्रकल्प

Cotton Market : परभणी, हिंगोलीत कापसाची १२.७० लाख क्विंटल खरेदी

SCROLL FOR NEXT