खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य  महास्वामी
खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी 
मुख्य बातम्या

खासदार डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे जातप्रमाणपत्र रद्द

टीम अॅग्रोवन

सोलापूर  ः सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ हे आता जात प्रमाणपत्रावरुन चांगलेच अडचणीत आले आहेत. जातप्रमाणपत्रासाठी दिलेले पुरावे बनावट असल्याचा अहवाल दक्षता समितीने दिल्यानंतर जातपडताळणी समितीने त्यांचे जातप्रमाणपत्र रद्द करण्याचा निकाल दिला आहे. समितीच्या या निर्णयामुळे भाजपाला मोठा धक्का बसल्याचे मानले जाते. 

लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲड. प्रकाश आंबेडकर यांना पराभूत करत भाजपचे डॅा. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी विजय मिळवला होता. त्यावेळी डॅा. महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज भरताना बेडा जंगम जातीचा बोगस दाखला सादर केल्याची तक्रार त्यांचे दुसरे प्रतिस्पर्धी उमेदवार प्रमोद गायकवाड यांच्यासह राजेंद्र मुळे, विनायक कंदकुरे यांनी केली होती. या प्रकरणावर गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरातील जातप्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सुनावणी सुरू आहे. या आधी २७ डिसेंबरला झालेल्या सुनावणीत खासदार डॉ. महास्वामींनी वडिलांच्या नावाने असलेले ‘फसल उतारे’ पुराव्यासाठी सादर केले होते. महास्वामींनी सादर केलेले उतारे खातरजमा करण्यासाठी दक्षता समितीकडे देण्यात आले होते.

दक्षता समितीच्या पाहणीत संबंधित तहसील कार्यालयात रजिस्टरच्या तपासणीत फसल उताऱ्यांच्या नोंदी सुस्थितीत आणि पाने चिटकावलेल्या स्थितीत आढळले. तसेच इत्तर नोंदीही अस्पष्टपणे दिसत असल्यामुळे जातीचा स्पष्ट उल्लेख झाला नाही. त्यामुळे या दोन्ही उताऱ्यांबाबत दक्षता समितीला संशय निर्माण झाला. परंतु त्यावर खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडून १७५ पानी म्हणणे सादर केले गेले. तसेच डॉ. महास्वामी यांच्या तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मुदतही मागितली होती, त्यानुसार जातपडताळणी समितीने मुदतही दिली. मात्र, त्यावेळीही जात प्रमाणपत्राबाबत कोणतेही ठोस पुरावे सादर न झाल्याने जातप्रमाणपत्र पडताळणी समितीने निकाल राखून ठेवला होता. सोमवारी (ता.२४) पुन्हा यावर सुनावणी झाली, तेव्हा त्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्याचा निर्णय समितीने दिला.   डॅा. महास्वामी उच्च न्यायालयात दाद मागणार सोलापुरातील जातपडताळणी समितीने घेतलेल्या या निर्णयाविरुद्ध खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे आता उच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. जातपडताळणी समितीकडे जातप्रमाणपत्राबाबत जोडलेली कागदपत्रे आणि संबंधित पुराव्यासह आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे यापूर्वीच डॉ. महास्वामी यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे कायद्याचा आधार घेऊन आम्ही निकाल दिला आहे. ज्यांना निकाल मान्य नाही, ते न्यायालयात दाद मागू शकतात, असे जातपडताळणी समितीकडून सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT