पूर किंवा वादळी स्थितीमध्ये येणाऱ्या पाण्याच्या लोंढ्याचे शुद्धीकरण करण्याची नवी पद्धती बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केली आहे. वाळूंच्या कणांवर खनिजांचे आवरण केल्यामुळे त्यांची गाळण क्षमता वाढते. परिणामी अवर्षणाच्या किंवा पाण्याच्या ताण स्थितीमध्ये अशा पाण्याचा पिण्यासाठी वापर करणे शक्य होते. डोंगर दऱ्यामध्ये पावसाचे पाणी कोणालाही आकर्षित करते. मात्र, शहरामध्ये पावसाच्या पाण्यामध्ये अनेक विषारी किंवा प्रदूषणकारक घटक मिसळले जातात. त्याचा रंग बदलतो. असे पाणी त्वरित नद्या किंवा पाण्याच्या जवळच्या प्रवाहामध्ये सोडण्याची किंवा निचरा करण्याची व्यवस्था केलेली असते. कॅलिफोर्निया -बर्केले विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी जोसेफ चार्बोन्नेट व त्यांच्या गटाने अशा वाहत्या पाण्याचा प्रवाह भूजलामध्ये मिसळण्याआधी खनिज आवरण असलेल्या वाळूतून पुढे पाठवण्याची व्यवस्था केला. या साठवलेल्या पाण्याचा वापर कोरड्या आणि ज्या भागामध्ये कमी पाऊस पडतो, अशा लॉस एंजेलिससारख्या ठिकाणी होऊ शकतो. भूजल स्तरामध्ये (अॅक्वीफर) त्यांचा साठा करणे शक्य आहे. - पाण्याच्या प्रवाह हा खनिज आवरण असलेल्या वाळूतून पुढे पाठवला जातो. वाळू नैसर्गिकपणे मोठ्या प्रदूषण कणांना वेगळे करण्याचे काम करते. त्यावर खास विकसित केले आवरण सेंद्रिय प्रदूषक घटकांशी प्रक्रिया करून ते नष्ट करतात. भूमिगत जल साठ्यामध्ये पाण्याचा निचरा होताना तो सुरक्षित व शुद्ध असावा, यासाठी वाळूचा वापर केला जातो. पिण्यासाठी सुरक्षित पाणी साठे करण्यासाठी या तत्त्वाचा उपयोग होऊ शकतो. या विषयी माहिती देताना जोसेफ चार्बोन्नेट यांनी सांगितले, की पूर किंवा वादळी पाण्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती उपलब्ध नसल्याने या पाण्याकडे जलस्रोतांचे प्रदूषण या नजरेने पाहिले जाते. या पाण्यातील प्रदूषणकारी घटक वेगळे करण्यासाठी आम्ही नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यासाठी वापरली जाणारी खनिजो ही कमी किमतींची, पर्यावरणपूरक असून, नैसर्गिकरीत्या उपलब्ध होणारी आहेत.
प्रदूषक घटक केले जातात कमी ः चार्बोन्नेट व त्यांच्या गटाने साध्या वाळूमध्ये दोन प्रकारातील मॅंगेनीज मिसळले. त्यांच्या प्रक्रियेतून मॅंगेनीज ऑक्साईड तयार होते. हे खनिज सेंद्रिय रसायनांना बांधून ठेवते. त्याचे लहान मूलद्रव्यांमध्ये तुकडे करते. परिणामी त्यांचे विषारीपण कमी होते. त्यांचे विघटन होण्यास मदत होते.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.