साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमी
साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमी 
मुख्य बातम्या

साखरेच्या गोळ्याही करतील वेदना कमी

वृत्तसेवा

वाढत्या स्थौल्यत्वासारख्या व त्या अनुषंगाने उद्भवणाऱ्या अनेक आजारांमुळे साखरेकडे पाहण्याचा सर्वसामान्यांचा दृष्टिकोन गढूळ झाला आहे. मात्र, तीव्र वेदनादायक आजारांमध्ये साखरेच्या गोळ्या वेदनाशामक म्हणून काम करत असल्याचा नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे. मेंदूची संरचना आणि मानसशास्त्र यावर आधारित या अभ्यासामध्ये सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांइतक्याच कार्यक्षमपणे वेदना कमी करण्याचे काम साखरेच्या गोळ्या करत असल्याचे त्यांचे मत आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष ‘नेचर कम्युनिकेशन्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले. विविध औषधांच्या चाचण्या घेण्यासाठी सारख्याच दिसणाऱ्या पण अजिबात मूळ औषधांचे गुणधर्म नसलेल्या गोळ्यांचा वापर केला जातो. मात्र, केवळ आपण औषध घेत असल्याच्या मानसिक विचारानेही शरीर त्या खोट्या गोळ्यांनाही प्रतिसाद देते. या परिणामाला इंग्रजीमध्ये ‘प्लासिबो इफेक्ट’ असे म्हणतात. याच परिणामांचा नेमका अभ्यास नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील फेईनबर्ग औषधशास्त्र विद्यालयातील संशोधकांनी केला असून, त्याला मेंदूची संरचना आणि मानसशास्त्रीय गुणधर्मांची जोड देण्यात आली आहे. त्याविषयी माहिती देताना मानसशास्त्राचे प्रा. ए. वनिया अपकारिअन यांनी सांगितले, की माणसाचा मेंदू हा प्रतिक्रिया देण्यासाठी बनलेला आहे. प्रत्येकामध्ये जीवशास्त्र आणि मानसशास्त्राची एक स्थिती तयार होते. केवळ याने वेदना कमी होणार आहेत, असे म्हटल्यानेही रुग्णांना वेदना कमी होऊन चांगले वाटू लागते. रुग्णांना साखरेच्या गोळ्या देताना फसवण्याची गरज नाही. गोळ्याचे शरीरावर कोणतेही परिणाम होणार नसले तरी मेंदू या गोळ्यांना चांगला प्रतिसाद देईल. हे अशास्त्रीय नाही, कारण प्लासिबो मागेही जीवशास्त्रीय तथ्ये आहेत. साखरेच्या गोळ्यांचे तीन फायदे आहेत.

  • परिणाम जर सारखेच मिळत असतील, तर कार्यक्षम घटक असलेल्या औषधांच्या तुलनेमध्ये प्लासिबो गोळ्या देणे अधिक फायदेशीर आहे. यातून दीर्घकाळ सातत्यपूर्ण गोळ्या खाण्यातून उद्भवणारे साइड इफेक्ट्स टाळता येतात.
  • औषधांच्या चाचण्यातून प्लासिबो परिणाम कमी करणे. सध्या औषधांच्या चाचण्यासाठी प्लासिबो इफेक्ट पद्धतीने गोळ्या दिल्या जातात.
  • अनेक आजारांमध्ये पुढे केवळ वेदनाशामक औषधांचा वापर होतो. या औषधांचा खर्चही मोठा असतो. तो टाळता येऊ शकतो.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT