रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका
रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका 
मुख्य बातम्या

रोबोट्स निभावतील शिक्षक सहायकाची भूमिका

वृत्तसेवा

लहान मुलांच्या शिक्षणपद्धतीमध्ये रोबोट हे पूर्णपणे शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत. मात्र, सहायक म्हणून अत्यंत मोलाची भूमिका ते नक्कीच निभाऊ शकतील, असे प्लायमाउथ विद्यापीठातील संशोधकांना आढळले आहे. प्लायमाउथ विद्यापीठातील रोबोटिक्सचे प्रा. टोनी बेल्पाईमे यांनी सांगितले, की अनेक वर्षांपासून वर्गासाठी खास रोबोट्स निर्मिती करण्याचा प्रयत्न संशोधक करत आहेत. केवळ तंत्रज्ञान आणि गणिताच्याच नव्हे, तर सामाजिक रोबोट्स निर्मितीकडेही कल आहे. फळा, खडू, कागदपासून संगणक, टॅबलेटपर्यंत पोचलेल्या शिक्षणव्यवस्थेमध्ये भविष्यात रोबोट्स दिसू लागतील. त्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या एकूण प्रगतीकडे लक्ष ठेवण्यासाठी वेळ मिळू शकेल.

  • सध्या झालेल्या अभ्यासामध्ये येल विद्यापीठ, त्सुकूबा विद्यापीठ येथील अभ्यासक्रमावर आधारित चाचण्या घेण्यात आल्या. त्यात आतापर्यंत प्रकाशित झालेल्या १०० पेक्षा अधिक अशा संशोधनाचा आढावा घेतला गेला.
  • मुलांमध्ये शब्द संख्या आणि मूळ अंक असे लहान धडे देण्यासाठी रोबोट्स उपयोगी आहेत. मात्र, बोलण्याची ओळख पटवणे आणि सामाजिक एकत्वाची भावना अशा काही तांत्रिक मर्यादांमुळे शिक्षकांना सहायक अशा स्वरूपामध्ये रोबोट्सची भूमिका मर्यादित राहते.
  • त्यात प्रामुख्याने लहान मुलांचे बोलणे ओळखणे ही तांत्रिक अडचण दिसून आली.
  • प्रत्यक्ष शाळांपर्यंत रोबोट्स पोचवण्यासारख्या अडचणी आहेत.
  • केवळ अडचणीच्या वेळी रोबोट्सची मदत घेण्याऐवजी प्रत्येक वेळी त्यावर अवलंबून राहण्याचे प्रमाण वाढते.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

    Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

    Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

    Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

    Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

    SCROLL FOR NEXT