राखेतील घटकांचे माशांमध्ये होतेय प्रदूषण
राखेतील घटकांचे माशांमध्ये होतेय प्रदूषण  
मुख्य बातम्या

राखेतील घटकांचे माशांमध्ये होतेय प्रदूषण

वृत्तसेवा

कोळशाच्या ज्वलनानंतर शिल्लक राखेचे प्रदूषण तलावात होत असून, ते माशांच्या कल्ल्याजवळील हाडांपर्यंत पोचत आहे. या आंतरकर्णापर्यंत पोचलेल्या सूक्ष्म मूलद्रव्यांच्या वापर विविध घटकांमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा माग काढण्यासाठी होऊ शकतो, असे संशोधन ड्यूक विद्यापीठात करण्यात आले आहे. तलावाच्या परिसंस्थेमध्ये होणाऱ्या प्रदूषणाचा माग घेण्यासाठी माशांचा अभ्यास फायद्याचा ठरणार आहे. हे संशोधन ‘जर्नल एन्व्हायर्नमेंटल सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी लेटर्स’मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. ड्यूक विद्यापीठातील संशोधिका जेस्सिना ब्रॅण्ड्ट व त्यांच्या सहकाऱ्यांनी ईशान्य कॅरोलिना येथील सभोवती कोळशावर आधारित ऊर्जानिर्मिती उद्योग असलेल्या मायो आणि सटन या दोन तलावांतील माशांचा व तलावातील तळाच्या पाणी नमुन्यांचा अभ्यास केला आहे. त्यामध्ये आढळणाऱ्या स्ट्रोन्टियम आयसोटोपचे गुणोत्तर मिळवून, त्याची तुलना तलावातील तळाच्या पाण्याच्या नमुन्यांशी करण्यात आली. यातून मिळालेले स्टोन्टियमचे गुणोत्तर हे एखाद्या बोटाच्या ठशाप्रमाणे नेमक्या प्रदूषक घटकांच्या ओळखीचे काम करणार आहे. याच पद्धतीने परिसरातील कोळशांच्या राखेचे सजीवांवर होणारे परिणामही तपासता येणार आहेत. आपल्या संशोधनाविषयी माहिती देताना संशोधिका जेस्सिना ब्रॅण्ड्ट म्हणाल्या, की माशांच्या आंतरकर्णामध्ये कॅल्सिफाईड संरचना (ओटिलिथ्स) मिळाल्या आहेत. या भागामध्ये माशांची रासायनिक आणि भौतिक माहीती उदा. वय, त्याचे वर्तन आणि स्थलांतराचे पॅटर्न साठवलेले असतात. जल परिसंस्थांमध्ये वाढत असलेल्या प्रदूषणाविषयी माहितीही येथे जमा होणाऱ्या प्रदूषक घटकांवरून उपलब्ध होऊ शकते. स्ट्रोन्टियम हे कोळशामध्ये नैसर्गिकरीत्या आढळणारे सूक्ष्म मूलद्रव्य आहे. जेव्हा कोळसा जाळला जातो आणि त्याची राख होते, या प्रक्रियेत विशिष्ट आयसोटोप गुणोत्तर राखले जाते. अशा राख पाण्यात मिसळली जाऊन मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. या आधी पाण्याच्या दर्जावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास झाला असला, तरी प्रथमच माशांमध्ये त्यांचे अंश आढळले असल्याची माहिती ड्यूक विद्यापीठातील प्रो. अॅवनेर वेन्गोष यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT