जूनमध्ये चिनी आल्याच्या किमतीत वेगाने वाढ
जूनमध्ये चिनी आल्याच्या किमतीत वेगाने वाढ 
मुख्य बातम्या

जूनमध्ये चिनी आल्याच्या किमतीत वेगाने वाढ

वृत्तसेवा

गेल्या सहा महिन्यांमध्ये निर्यातक्षम चिनी आल्याच्या किमतीमध्ये वेगाने वाढ होत असून, केवळ एक महिन्यामध्ये किमती ४० टक्क्यांनी वाढल्या आहेत. गेल्या वर्षाच्या याच काळातील किमतीचा तुलनात्मक अभ्यास केल्यास बाजाराची स्थिती असामान्य असल्याचे मत अनक्विऊ तायलाई फूड्सचे विक्री व्यवस्थापन जेसन यांनी सांगितले. सामान्य स्थितीमध्ये चीन येथील बाजारामध्ये जून आणि जुलै हा कालावधी आले निर्यातीच्या दृष्टीने नरम असतो. या काळामध्ये आल्याच्या किमतीमध्ये वाढ होण्यामागे दोन घटक असू शकतात. गेल्या वर्षी प्रमुख आले उत्पादक पट्टा असलेल्या शान्डोंग प्रांतामध्ये तीव्र वातावरणाची स्थिती आणि पूर परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्याचा फटका आल्याचे उत्पादन आणि दर्जा या दोन्हीला बसला. परिणामी उच्च दर्जाच्या निर्यातक्षम आल्याचे उत्पादन लक्षणीयरीत्या कमी झाले. या परिस्थितीमुळे निर्यातदारांनी या वर्षी आल्याची लवकर खरेदी आणि साठवण सुरू केली असावी. सुरवातीच्या स्थितीमध्ये खरेदी करून भविष्यातील बाजारातील वाढत्या किमतीचा लाभ घेण्याचा त्यांचा विचार असावा. मात्र, सध्या अचानक वाढलेल्या किमतीमुळे बहुतांशी व्यापाऱ्यांनी सावध भूमिका घेतली आहे. त्यांनी काही प्रमाणात खरेदी करणे थांबवल्यामुळे काही भागांमध्ये किमती कमी होत असल्याचेही चित्र आहे. नव्या हंगामातील आल्याची काढणी ऑक्टोबरच्या मध्यावर सुरू होईल. डिसेंबर अखेरपर्यंत प्रक्रियेचा हंगाम चालेल. त्यापूर्वी आल्याची निर्यात बाजारपेठ तुलनेने स्थिर राहील, असा अंदाज आहे. अर्थात हे सारे उत्पादन आणि व्यापाऱ्यांच्या एकूण कलानुसार ठरेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT