वराह पिले वाचविण्यासाठी कॅमेरे ठरतील उपयोगी
वराह पिले वाचविण्यासाठी कॅमेरे ठरतील उपयोगी 
मुख्य बातम्या

वराह पिले वाचविण्यासाठी कॅमेरे ठरतील उपयोगी

वृत्तसेवा

उच्च दर्जाच्या त्रिमितीय प्रतिमांच्या साह्याने नव्या जन्मणाऱ्या वराह पिलांचे संरक्षण करण्याचे तंत्र अमेरिकी संशोधन सेवा विभागातील संशोधकांनी विकसित केले आहे. मादी वराह आपल्याच पिलांना पोचवत असलेल्या जीवघेण्या इजांपासून पिले वाचवणे शक्य होईल.

दरवर्षी विविध कारणांमुळे वराहपालनामध्ये सुमारे १५ टक्के वराह पिले मृत होतात. अमेरिकी पोर्क उत्पादकांच्या मते, त्यातील अनेक पिले ही मादीच्या अंगाखाली येऊन मरतात. यासाठी मादीच्या कक्षाची सुधारणा आणि क्रेट्स या माध्यमातून काही प्रमाणात मृत्यूचे प्रमाण कमी होते. यावर उपाययोजना शोधण्यासाठी नेब्रास्का येथील अमेरिकी प्राणीज मांस संशोधन केंद्र येथे कार्यरत कृषी अभियंता टॅमी ब्राऊन - ब्रँडी यांनी प्रथम मादी मात आणि पिलाच्या वर्तणुकीचा अभ्यास केला. प्राण्यांच्या वर्तणुकीच्या अभ्यासातून त्यांचे आरोग्य आणि एकमेकांना इजा न करता चांगलेपणाने राहण्यासंदर्भात अनेक बाबी उघड झाल्या. त्याचा फायदा वराहपालकांना होऊ शकतो. संशोधक टॅमी ब्राऊन- ब्रँडी आणि त्यांच्या चीन येथील सहकाऱ्यांनी आयोवा येथील काही फार्म आणि विद्यापीठामध्ये पिलांच्या त्रिमितीय प्रतिमांचे विश्‍लेषण आणि प्रक्रिया करणारे स्वयंचलित तंत्र विकसित केले आहे. त्यासाठी पिलाच्या जन्मावेळेपासून एका कॅमेराच्या साह्याने मादी व पिलांच्या प्रतिमा घेतल्या जातात. मादी नेमक्या कशा प्रकारे खाते, पिते, उभी राहते, बसते किंवा झोपते यांचा अभ्यास केला जातो. या वागण्याची विविध दृष्टिकोनातून विभागणी केली जाते. त्यामुळे पिले मादीच्या अंगाखाली येऊन मरण्याचे प्रमाण कमी करणे शक्य होते. असे होतील या तंत्राचे फायदे ः

  • या तंत्रामुळे वराहपालनामध्ये प्राण्यांच्या निरीक्षणासाठी मदत होणार आहे.
  • लहान पिलांच्या मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्‍यकतेनुसार क्रेट्चा आकार, कोठीचा आकार कमी जास्त करता येईल.
  • आजारी प्राणीही त्वरित ओळखणे शक्य होईल.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

    Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

    Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

    Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

    Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

    SCROLL FOR NEXT