झिंग्यांपासून खाद्यपदार्थ बनविण्यासाठी नवे नियम मार्चपासून
झिंग्यांपासून खाद्यपदार्थ बनविण्यासाठी नवे नियम मार्चपासून  
मुख्य बातम्या

झिंग्यांपासून खाद्यपदार्थ बनविण्यासाठी नवे नियम मार्चपासून

वृत्तसेवा

स्वित्झर्लंड देशामध्ये जिवंत झिंगे उकळत्या पाण्यामध्ये टाकून त्यापासून काही खाद्यपदार्थ तयार केले जातात. मात्र, या अमानवी पद्धती रोखण्यासाठी राष्ट्रीय प्राणीसंरक्षण कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या असून, येत्या मार्चपासून त्यांची अंमलबजावणी सुरू होईल. माणसांप्रमाणे प्राण्यांच्या हक्कांविषयी अत्यंत जागरूक मानल्या जाणाऱ्या स्वित्झर्लंडमध्ये काही अमानवी वाटणाऱ्या पद्धती रुजलेल्या आहेत. त्या नष्ट करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जंगली आणि पाळीव प्राण्यांशी क्रुरपणे वागण्यासाठी कायदेशीररीत्या शिक्षा जाहीर केलेल्या आहेत. त्यात आता झिंग्यांचाही समावेश करण्याचा निर्णय स्थानिक कायेद मंडळाने घेतला आहे. त्यानुसार झिंग्याचा (लॉबस्टर) मेंदू इलेक्ट्रिक शॉक किंवा अवजाराने नष्ट केल्यानंतर खाद्यपदार्थ निर्मितीसाठी झिंग्याचा वापर करता येईल. पूर्वी शेलफिश, खेकडे किंवा झिंग्यांना वेदना होत नसल्याचे मानले जात होते. मात्र, २०१३ मध्ये ब्रिटिश संशोधक बॉब एलवूज यांच्या अभ्यासात या प्राण्यांनाही वेदना होत असल्याचे दिसून आले. तेव्हापासून प्राणीसंरक्षणविषयक जागृत लोक सातत्याने याविषयी प्रयत्न करत होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Loksabha Election 2024 : धाराशिवमध्ये मोठी चुरस

Liger Pesticide : ‘जीएसपी’चे कीटकनाशक ‘लायगर’ बाजारात

Forest Fire : उत्तराखंडच्या जंगलात आगीचे लोळ; मुख्यमंत्री धामींच्या लष्कराची मदत घेण्याच्या प्रशासनाला सूचना

Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

Agriculture Technology : गाईच्या शेणापासून बनविले ‘गोबायर’

SCROLL FOR NEXT