शेंगवर्गीय आच्छादन पिकांचा होतो नत्र स्थिरीकरणासाठी फायदा
शेंगवर्गीय आच्छादन पिकांचा होतो नत्र स्थिरीकरणासाठी फायदा  
मुख्य बातम्या

शेंगावर्गीय आच्छादन पिकांचा होतो नत्र स्थिरीकरणासाठी फायदा

वृत्तसेवा

नत्रयुक्त खतांची अधिक मागणी असणाऱ्या स्वीट कॉर्नसारख्या पिकांमध्ये शेंगावर्गीय (फॅबा बिन्स) आच्छादन पीक घेतल्यास नत्राच्या खर्चामध्ये अर्ध्यापर्यंत बचत करणे शक्य होत असल्याचे संशोधनामध्ये आढळले आहे. प्राचीन काळापासून फॅबी बीन हे आच्छादन पीक म्हणून वापरले जाते. दोन मुख्य पिकांच्या दरम्यानच्या काळात या पिकांची लागवड केली जाते. या पिकामुळे मातीची धूप थांबते. तणांना रोखले जाते. सामान्यतः आच्छादन पिकांसाठी गवतवर्गीय, शेंगावर्गीय पिकांचा अवलंब केला जातो. फॅबा बिया हे प्रथिनांचा उत्तम स्रोत असून, शेतजमिनीसाठीही नत्र स्थिर करत असल्याने फायदेशीर ठरते. या पिकाचे अवशेष जमिनीमध्ये गाडल्यास आणखी फायदा होतो. मॅसेट्युसेट्‌स विद्यापीठातील संशोधक मासौद हशेमी आणि सहकाऱ्यांनी स्विट कॉर्न पिकाच्या लागवडीपूर्वी फॅबा बीनचे आच्छादन पीक घेऊन चाचण्या घेतल्या. फॅबा बीनच्या उत्पादनानंतर त्याचे अवशेष जमिनीमध्ये गाडण्यात आले. त्याचाही चांगला फायदा होत असल्याचे दिसून आले.

  • हिवाळ्यापूर्वी लागवड केलेल्या फॅबा बीनची वाढ रोखली गेली. त्यामुळे बायोमास कमी मिळाले. अधिक बायोमास म्हणजे अधिक नत्र, असे समीकरण असते. त्यामुळे फॅबा बीनची लागवड दोन आठवडे उ.िशरा म्हणजेच एक ऑगस्ट दरम्यान केल्यास बायोमासचे प्रमाण दुप्पट होत असल्याचे दिसून आले
  • या जमिनीमध्ये नंतर स्वीट कॉर्नची लागवड केली असता, अधिक उत्पादन मिळाले. त्याचप्रमाणे ज्या शेतामध्ये आच्छादन पिकांचे अवशेष मशागतीविना कुजू दिले होते, तिथे उत्पादनामध्ये लक्षणीय वाढ आढळली. सावकाश कुजत असल्याने सावकाश नत्राची उपलब्धता होत असल्याने स्वीट कॉर्न पिकाला फायदा होतो.
  • मशागत केलेल्या शेतातील अवशेष लवकर कुजतात. परिणामी, नत्राची उपलब्धता लवकर होते.
  • केवळ आच्छादन पिकाच्या माध्यमातून स्वीट कॉर्नसाठी आवश्यक पूर्ण नत्राची उपलब्धता शक्य नाही. त्यामुळे रासायनिक खताच्या माध्यमातून त्याची पूर्तता करावी लागते. मात्र, तरीही आच्छादन पीक घेतलेल्या शेतामध्ये सामान्य पिकाच्या तुलनेमध्ये खतावरील खर्चात अर्ध्याने बचत होते.
  • या संशोधनाचे निष्कर्ष ‘अॅग्रोनॉमी जर्नल’ मध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

    Environment Emergency : सावधपणे ऐका निसर्गाच्या हाका...

    International Labor Day : शेतकऱ्यांकडे माणूस म्हणून कधी पाहणार?

    Farmer Issue : लोकशाहीच्या उत्सवात शेतकरी दुर्लक्षितच

    Cashew Farming : काजू हंगाम अंतिम टप्प्यात

    SCROLL FOR NEXT