द्रवरूप कार्बन डायऑक्साईड ठरेल पिकांसाठी फायद्याचा
द्रवरूप कार्बन डायऑक्साईड ठरेल पिकांसाठी फायद्याचा 
मुख्य बातम्या

द्रवरूप कार्बन डायऑक्साईड ठरेल पिकांसाठी फायद्याचा

वृत्तसेवा

द्रवरूप कार्बन डायऑक्साईडच्या फवारणीमुळे लेट्यूस भाज्याच्या उत्पादनामध्ये चार पटीने वाढ होत असल्याचे अमेरिकेतील झालेल्या चाचण्यामध्ये दिसून आले आहे. सध्या कॅलिफोर्नियामध्ये पिकांच्या उत्पादन वाढीसाठी हरितगृहांमध्ये वायुरूप कार्बन डायऑक्साईडचा वापरही वाढत आहे. लेट्यूस भाजीचे जागतिक मार्केट २६.८ दशलक्ष टन प्रतिवर्ष इतके असून, त्यातील अमेरिकेमध्ये ४ दशलक्ष टन प्रतिवर्ष (१५.२ टक्के) इतके उत्पादन अमेरिकेमध्ये होते. त्यातील ९० टक्के अमेरिकन लेट्यूस हे कॅलिफोर्निया राज्यामध्ये होते. लेट्यूसची घाऊक बाजारातील किंमत १.१७ डॉलर प्रतिकिलो असून, एकूण जागतिक बाजारपेठेमध्ये प्रतिवर्ष सुमारे ३० अब्ज डॉलर इतकी उलाढाल आहे. त्यामुळे या पिकामध्ये उत्पादनवाढीच्या मोठ्या संधी आहेत.   अमेरिकेतील मिन्निसोटा येथील सेंट क्लाऊड राज्य विद्यापीठामध्ये द्रवरूप कार्बन डायऑक्साईडच्या लेट्यूस या भाजीवर फवारण्या घेण्यात आल्या. दर १५ मिनिटांनी चार तासांसाठी घेतलेल्या या फवाऱ्यामुळे रोमेन लेट्यूस भाज्यांमध्ये हरितद्रव्याचे प्रमाण चार पटीने वाढल्याचे दिसून आले. अधिक हरितद्रव्य असल्यास पिकाची वाढ वेगाने आणि अधिक प्रमाणात होते. टोरॅंटो येथील सीओ२ ग्रो या खासगी कंपनीने द्रवरुप कार्बन डायऑक्साईड फवारणीसाठी तयार केला आहे. लेट्यूस उत्पादनामध्ये द्रवरूप कार्बन डायऑक्साईडच्या फवारणीचे प्रयोग घेण्यात आले. त्यातून मिळणारे उत्पादन हे कमी पाण्यात होऊ शकते. सेंट क्लाऊड यांच्या अहवालानुसार प्राथमिक प्रयोगांमध्ये कार्बन डायऑक्साईडच्या द्रवरूप फवारणीमुळे वनस्पतीअंतर्गत वेगाने शरीरशास्त्रीय बदल झाल्याचे आढळले. प्रयोगाच्या एकूण आकडेवारीवरून अशा कर्ब फवारणीतून पिकांच्या वाढीला लक्षणीय चालना मिळत असल्याच्या गृहीतकाला पाठबळ मिळते.   याआधी गुयेल्फ विद्यापीठामध्ये झालेल्या चाचण्यामध्ये रोमेन लेट्यूसच्या उत्पादनामध्ये विशेषतः बायोमासमध्ये १०० टक्के वाढ दिसून आली होती. त्याची तुलना ८०० पीपीएम कार्बन डायऑक्साईड वायूचा पुरवठा केलेल्या लेट्यूस पिकाशी करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT