नेटाफीम बातमी
नेटाफीम बातमी 
मुख्य बातम्या

इस्राईल येथील अॅग्रिटेकसाठी नेटाफिमद्वारे अभ्यास दौरा

कोजेन्सिस वृत्तसेवा

नेटाफिम इरिगेशन इंडिया प्रा.लि. या कंपनीतर्फे गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा परिचय व्हावा, यासाठी इस्राईल येथील अॅग्रिटेक प्रदर्शनाच्या औचित्याने अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले जाते. या वर्षी मंगळवारपासून (ता. ८) आयोजित दौऱ्यामध्ये भारतभरातील २२५ शेतकऱ्यांचा सहभाग होता. या दौऱ्यामध्ये रोबोटिक डेअरी फार्म, गिनेगार प्लॅस्टिक उद्योग, जॉर्डन व्हॅलीतील खजूर, पाम व केळी लागवड, मेवो हामा किबूत्स येथील द्राक्ष, आंबा लागवड, अत्याधुनिक पॅकेजिंग, राष्ट्रीय पाणी व्यवस्थापन प्रकल्प यासोबतच अॅग्रिटेक या आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शनाला भेट देण्यात आली. या दौऱ्यामध्ये गेनाभाई पटेल (गुजरात), विजयराव जाधव (नगर), पोपटराव पवार (सरपंच, हिवरेबाजार) अशा अनेक प्रगतिशील शेतकऱ्यांसोबतच त्रिवेंद्रसिंग रावत (मुख्यमंत्री, उत्तराखंड), पांडुरंग फुंडकर (कृषिमंत्री, महाराष्ट्र), सुबोध उनियाल (कृषिमंत्री, उत्तराखंड), महाराष्ट्र राज्याचे कृषी सचिव, उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव धर्मराजू पांडियान यासह सूक्ष्म सिंचन प्रकल्प (आंध्र प्रदेश) येथील प्रमुख अधिकाऱ्यांचा समावेश होता. अॅग्रिटेक प्रदर्शनाच्या औचित्याने नेटाफिम कंपनीच्या वतीने सूक्ष्म सिंचनातील अत्याधुनिक अशा स्वयंचलित सूक्ष्म सिंचन प्रणाली ‘नेटबिट’ या नवीन उत्पादनाचे बाजारामध्ये सादरीकरण करण्यात आले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Development : शेती विकासाला केंद्र सरकारने कायम प्राधान्य दिले

Crop Insurance : गतवर्षीच्या खरिपातील ३० कोटी पीकविमा मंजूर

Jaljeevan Mission : रायगडमध्ये जलजीवनची निम्‍मी कामे अपूर्ण

Mango Market : उरणमध्ये आंब्यांची आवक वाढली

Water Scarcity : पाणीपुरवठा संस्थांचे शेतकरी पाणी टंचाईच्या कात्रीत

SCROLL FOR NEXT