विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस 
मुख्य बातम्या

मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांना तत्काळ मदत द्या ः देवेंद्र फडणवीस

टीम अॅग्रोवन

मुंबई : विदर्भातील पुरापाठोपाठ मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त पिकांचे जलद पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.

पत्रात श्री. फडणवीस यांनी म्हटले आहे, की संपूर्ण मराठवाड्याला अतिवृष्टीने झोडपले. यंदा चांगला मॉन्सून झाल्याने पेरणीक्षेत्रात वाढ होऊन अतिशय चांगली पिके आली होती. पण, अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतांमधील मातीसुद्धा वाहून गेली आहे. जवळपास १८०० पेक्षा अधिक गावे यामुळे प्रभावित झाली. सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा तसेच अन्यही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

काही तालुक्यांमध्ये तर नुकसान ७० टक्क्यांवर आहे. जालन्यासारख्या भागात मोसंबीचे मोठे नुकसान झाले आहे. सावरगाव, भिलपुरी, मौजपुरी, माणेगाव, नसडगाव आणि इतरही तालुक्यांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. परभणीत अजूनही शेतात पाणी आहे. गंगापूर, खुलताबाद याही भागांत मोठे नुकसान झाले. मूग, उडीद पिकांना फटका बसला. काही ठिकाणी मुगाला तर शेतातच कोंब फुटले. हीच स्थिती मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आहे.

आधीच ‘कोरोना’चे संकट आणि त्यात सातत्याने हे अस्मानी संकट त्यामुळे मानसिकदृष्ट्या शेतकरी खचला आहे. याचवेळी शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहण्याची तसेच त्यांना तातडीने मदत करण्याची गरज आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून थेट मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी विनंती असल्याचे श्री. फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.

प्रतिक्रिया

मराठवाड्यात घरांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकरी पूर्णपणे खचला आहे. अशात केवळ मंत्र्यांनी दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश दिले आहेत, असे सांगून मोकळे व्हायचे, असे चालणार नाही. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे, याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT