Upsa scheme of Shelgaon Barrage should be implemented 
मुख्य बातम्या

शेळगाव बॅरेजची उपसा योजना कार्यान्वित व्हावी 

जळगाव : तापी खोरे विकास महामंडळांतर्गत जळगाव जिल्ह्यात पूर्ण होणारा शेळगाव बॅरेज हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे.

टीम अॅग्रोवन

जळगाव : तापी खोरे विकास महामंडळांतर्गत जळगाव जिल्ह्यात पूर्ण होणारा शेळगाव बॅरेज हा पहिलाच प्रकल्प ठरला आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन आता ऑगस्ट, सप्टेंबरअखेर त्यात पाणीही साठू शकेल. त्याचे अप्रत्यक्ष लाभ या क्षेत्राला होतीलच, पण त्यावरील यावल उपसा सिंचन योजना मंजूर होऊन पूर्ण होईपर्यंत प्रत्यक्षात कृषी सिंचन त्यापासून दूरच राहणार आहे. 

तत्कालीन युती शासनाच्या काळात १९९८-९९मध्ये तापी खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली. त्याअंतर्गत विविध तापी व अन्य नद्यांवरील विविध प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली. तापी नदीवर हतनूर धरणाखाली शेळगावसह निम्न तापी (पाडळसरे), सुलवाडे, सारंगखेडा, प्रकाशा आदी प्रकल्पांचे कामही सुरू झाले. शेळगाव व पाडळसरे वगळता अन्य प्रकल्पांचे काम बऱ्यापैकी मार्गी लागले.  शेळगावचे रखडलेल्या कामाला २०१४नंतर चालना मिळून केंद्राच्या बळीराजा संजीवनी योजनेतून काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. येत्या पावसाळ्यात त्यात पाणीही साठू शकेल. 

सिंचनासाठी ‘उपसा’ आवश्‍यक  शेळगाव प्रकल्प पूर्ण झाल्यामुळे जळगावसह यावल व भुसावळ तालुक्याला त्याचा प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष लाभ मिळणार आहेच. जळगाव, भुसावळ एमआयडीसीला व पाणीपुरवठा योजनांनाही शेळगावचा लाभ मिळू शकेल. मात्र, या प्रकल्पामुळे सिंचनाखाली येऊ शकणाऱ्या हजारो हेक्टर जमिनीला मात्र शेळगावच्या पाण्याची प्रतीक्षा राहणार आहे. कारण, प्रकल्प पूर्ण झाला असले तरी प्रत्यक्षात त्यावरील यावल उपसा सिंचन योजना अद्याप मंजूर नाही, त्यामुळे ही योजना मंजूर होऊन, तिचे काम पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाल्याशिवाय शेतीला पाणी मिळू शकणार नाही. त्यासाठी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करावा लागणार आहे.   

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Procurement: गंगाखेड केंद्रावर साडेतीन हजार क्विंटल सोयाबीन खरेदी

Swachh Bharat Mission: हिंगोली जिल्ह्यात ‘प्लॅस्टिक कचरा मुक्त गाव’ अभियान विशेष मोहीम

Farmers Compensation: परभणीत अतिवृष्टी अनुदानाचे ४२५ पैकी ३४२ कोटी रुपये वितरीत

Crop Loan: कर्ज वसुलीला स्थगिती तरी सेंटलमेंटच्या आडून तगादा

Vegetable Farming: दोडका उत्पादनात गुणवत्ता, दर्जा राखण्यावर भर 

SCROLL FOR NEXT