Solapur: Cloudy weather in Pandharpur, rains along with grapes, damage of raisins
Solapur: Cloudy weather in Pandharpur, rains along with grapes, damage of raisins 
मुख्य बातम्या

सोलापूर ः पंढरपुरात ढगाळ वातावरण, पावसाने द्राक्षासह, बेदाण्याचे नुकसान 

टीम अॅग्रोवन

सोलापूर ः गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सातत्याने ढगाळ वातावरण आहे. ऐन रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या पिकांना त्यामुळे फटका बसत आहे. पण द्राक्ष बागायतदारांची चिंता सर्वाधिक वाढली आहे. पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर तालुक्यात शुक्रवारी (ता.११) पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे या भागातील द्राक्ष आणि बेदाण्याचे मोठे नुकसान झाले. 

पंढरपूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच भागात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सकाळी काही प्रमाणात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. यामुळे काढणीला आलेले द्राक्षाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत पडले आहेत. त्या आधीही दोन दिवसांपासून काही प्रमाणात ढगाळ वातावरण होते. शुक्रवारी मात्र दिवसभर सर्वच भागात ढगाळ वातावरण राहिले. सकाळी सहा ते नऊच्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. याचा फटका द्राक्षबागांना बसला. पंढरपुरातील कासेगाव, सरकोली, तनाळी, आंबे, सिद्धेवाडी यासह दक्षिण सोलापुरातील निंबर्गी, बाळगी, लवंगी, सादेपूर, माळकवठे व बोरामणी, कासेगाव, होटगी, आहेरवाडी या भागात द्राक्षबागांचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सध्या द्राक्षाची काढणी व बेदाणे निर्मिती सुरू आहे. अनेकांनी द्राक्ष शेडमध्ये टाकले आहे. एकट्या पंढरपुरात सुमारे पाच हजार एकराहून अधिक क्षेत्रावरील द्राक्षांचा बेदाणा तयार होतो. आजघडीला सुमारे ४ हजार टन बेदाणा रॅकवर आहे. पण या पावसाने तो भिजला. अनेक ठिकाणी द्राक्षमण्यात पाणी गेल्याने द्राक्ष खराब झाली आहेत. आता द्राक्षासह बेदाण्याची प्रत घसरणार आहे. शिवाय दरातही घसरण होणार आहे. बार्शी आणि मंगळवेढ्यातही ऐन काढणीस आलेल्या ज्वारी, गहू, हरभऱ्याला त्याचा फटका बसला. 

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT