Postponement of elections of private bodies and societies
Postponement of elections of private bodies and societies 
मुख्य बातम्या

जळगाव : खासगी संस्था, सोसायट्यांच्या  निवडणुका स्थगित 

टीम अॅग्रोवन

जळगाव : ओमिक्रॉनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत आदेश जारी केले असून, यात जळगाव जिल्हा सहकारी नोकरांच्या सहकारी (ग.स.) सोसायटीचाही समावेश आहे.  खासगी शिक्षण संस्था व खासगी सोसायटी यांच्या निवडणूक प्रक्रिया राबविण्यास मनाई करण्याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी जारी केले. त्यात म्हटले कि, कोविड विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधक कायद्यानुसार आवश्‍यक त्या उपाययोजना निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच नियमांच्या अंतर्गत सुधारीत निर्बंधामध्ये खासगी शिक्षण संस्था, खासगी सोसायटी यांच्याकडून निवडणूक प्रक्रिया राबविण्याकामी परवानगी मिळण्याबाबत मनाई करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्या संस्था, सोसायटी यांच्या निवडणूकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे, अशा संबधित संस्था सोसायटींच्या निवडणूका पुढील आदेश येईपर्यंत पुढे ढकलण्यात याव्यात.  ‘ग. स.’ ची निवडणूक स्थगीत  जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी (ग. स.) सोसायटीची निवडणूक प्रक्रिया या आदेशामुळे स्थगित झाली आहे. तिसऱ्यांदा निवडणूक प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली आहे. सोसायटीच्या मतदार याद्या अंतीम करण्याची प्रक्रीया जिल्हा उपनिबंधक (सहकार) यांच्याकडे सुरू होती. येत्या दोन दिवसांत निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होण्याची शक्यता होती. मात्र, या आदेशामुळे त्याला मनाई मिळाली आहे. त्यामुळे आता पुढील आदेशाची प्रतिक्षा असणार आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

Mango Season : आंबा विक्रीतून एक कोटी ६३ लाखांची कमाई

Climate Change : बदलत्या हवामानामुळे ‘ग्रीन नेट’ला मरगळ

Tambul GI : तांबूलसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT