Farmers oppose Greenfield Highway land acquisition 
मुख्य बातम्या

ग्रीनफिल्ड महामार्ग भूसंपादनाला शेतकऱ्यांचा विरोध 

नाशिक : ‘ग्रीनफील्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार सुरत-चेन्नई हा ग्रीनफील्ड महामार्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यामधून जाणार आहे.त्यांनी जमिनीचा मोबदला कसा देणार याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. शेतकऱ्यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

टीम अॅग्रोवन

नाशिक : दळणवळणाला बूस्ट देण्यात हातभार लागणाऱ्या भारतमालांतर्गत ‘ग्रीनफील्ड महामार्ग’ संकल्पनेनुसार सुरत-चेन्नई हा ग्रीनफील्ड महामार्ग जिल्ह्यातील सहा तालुक्यामधून जाणार आहे. मात्र नाशिक तालुक्यातील आडगाव, लाखलगाव, ओढा, विंचूर गवळी येथील शेतकऱ्यांनी भूसंपादनास विरोध केला आहे. त्यांनी जमिनीचा मोबदला कसा देणार याबाबत स्पष्टीकरण मागितले आहे. शेतकऱ्यांनी नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांची भेट घेऊन निवेदन दिले. 

भूसंपादनाची अधिसूचना काढण्यापूर्वी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या प्रकल्पात जाणार आहे. त्यांच्यासमोर प्रकल्पाचे सादरीकरण करणे आवश्‍यक होते. त्याचबरोबर भूसंपादनाचा मोबदला कसा देणार, याबाबत माहिती मिळणे गरजेचे आहे. अधिसूचना जाहीर करताना जिरायती क्षेत्र दाखविण्यात आले आहे. परंतु वास्तविक बागायती क्षेत्र असून भूसंपादन करताना शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचा दावा करण्यात आला. 

ज्या जमिनी प्रकल्पासाठी घेतल्या जाणार आहेत. त्या महामार्गाला लागून आहेत. त्यामुळे सर्व्हिस रोड, अंडर पास यासंदर्भात काय तरतूद आहे, अशी माहिती मिळावी. या वेळी ॲड. प्रकाश शिंदे, शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख सुनील जाधव, विनायक कांडेकर, प्रदीप कांडेकर, तानाजी जाधव, प्रभाकर कांडेकर, भरत जाधव, गणेश ढिकले, अशोक शिंदे, भाऊसाहेब नाठे आदी उपस्थित होते. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver Second List: कर्जमाफीची दुसरी यादी प्रसिद्ध, ३ लाख ५५ हजार ६१४ पात्र शेतकऱ्यांचा समावेश

Agriculture Graduates Issues: कृषी पदवीधर, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर कृषिमंत्र्यांची भेट

Silk Farming: रेशीम शेतीतून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाची संधी : डॉ. महेंद्र ढवळे

Shetkari Samruddhi Kisan Rail: ‘शेतकरी समृद्धी’ किसान रेल नावालाच!

Sugarcane Price Protest: ऊस दर जाहीर न करताच जॅगरी प्रकल्प सुरू, 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली

SCROLL FOR NEXT