Crops leveled by unseasonal rains
Crops leveled by unseasonal rains 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यात बेमोसमी पावसाने पिके भुईसपाट

टीम अॅग्रोवन

पिंपळगाव बसवंत, लासलगाव, इगतपुरी  ः जिल्ह्यात बुधवारी (ता.९) पहाटेपासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने द्राक्ष उत्पादकांना झळा बसत आहे. अगोदर द्राक्षांचे दर गडगडलेले असतांना बेमोसमी पावसाचे थैमान शेतकऱ्यांसाठी दुष्काळात तेरावा महिना ठरत आहे. द्राक्षघड ओले होऊन मण्यांना तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी द्राक्षकाढणी थांबविली आहे. द्राक्षकाढणी थांबल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाणार असल्याने शेतकरी हादरले आहेत.  नाशिक जिल्ह्यातून दररोज साडेसात हजार टन द्राक्ष परराज्यात पोहचत होती. निफाड, दिंडोरी या द्राक्षाच्या आगारात अवकाळीने कहर केल्याने दोन दिवसापासून अवघे एक हजार टन द्राक्ष काढणी होऊ शकली. दरम्यान लासलगाव, ब्राह्मणगाव परिसरात द्राक्षा बागांना धोका पोचला असून गहूही आडवा झाला आहे. इगतपुरी तालुक्यात भात, गव्हाबरोबरच भाजीपाल्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात द्राक्ष उत्पादकांमागे लागलेले संकटाचे शुक्लकाष्ट थांबायला तयार नाही. दोन दिवासापासून अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या  पिकाभोवती फास आवळला आहे. अवकाळीचे आगमन द्राक्षउत्पादकांना धडकी भरविणारे ठरले आहे. द्राक्षांचे दर आधीच निच्चांकी पातळीवर आहेत, २५ ते ३० रूपये दराने व्यापाऱ्यांकडून सौदे सुरू आहेत. . काढणी थांबली.... अवकाळीमुळे ५६ हजार    एकरवरील बागामधील द्राक्षकाढणी थांबली आहे. द्राक्षघड ओले होऊन तडे गेल्याने व्यापाऱ्यांनी काढणीला ब्रेक लावला आहे. दोन दिवसापासून पावसाने खोडा घातल्याने अवघ्या ५० ट्रकमधून एक हजार टन द्राक्ष परराज्यात पोहचली. दर्जा घसरला असल्याचे कारण देत व्यापाऱ्यांनी काढणी थांबविली आहे. काही व्यापाऱ्यांनी अर्ध्यावर द्राक्षबागा सोडून सौदा मोडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठा फटका बसला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT