Amalner, Jalgaon: Record income of agricultural commodities in Amalner Market Committee 
मुख्य बातम्या

अमळनेर, जळगाव : अमळनेर बाजार समितीत  शेतमालाची विक्रमी आवक 

टीम अॅग्रोवन

अमळनेर, जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी (ता. ७) मालाची विक्रमी आवक झाली. बाजार समितीबाहेर धुळे - चोपडा रस्त्यावर दोन किलोमीटरची वाहनांची रांग लागली होती. 

अमळनेर बाजार समितीत मुख्य प्रशासक तिलोत्तमा पाटील यांच्यासह आठ प्रशासक नियुक्त करण्यात आले असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि कोरोनातील आर्थिक अडचणीतून बाहेर येण्यासाठी शेतकऱ्यांचा माल विक्री होताच त्यांना त्याच दिवशी रोखीने मालाचा मोबदला देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातीलच नव्हे तर पारोळा, चोपडा, शिरपूर, शिंदखेडा, धरणगाव आदी विविध तालुक्यातून शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता. गहू, हरभरा, मका, बाजरी, कापूस, सूर्यफूल, धना आदी मालाची आवक सोमवारी बाजार समितीत झाली होती. 

बाजार समितीबाहेर रस्त्यावर देखील वाहने उभी होती. लिलावाच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी पाणी व इतर सुविधा करण्यात आली होती. व्यापाऱ्यांनी देखील शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोबदला देण्याची व्यवस्था केली. हरभऱ्याची ७ हजार क्विंटल खरेदी झाली तर ४५४६ ते ७००० च्या मर्यादेत हरभऱ्याला भाव देण्यात आला. गव्हाला कमाल २,३४५ रुपये क्विंटल भाव देण्यात आला. ३ हजार क्विंटल गव्हाची खरेदी झाली. मक्याला १९२६ रुपये भाव होता. सुमारे १५०० क्विंटल मका खरेदी झाला. तुरीला ५६०० रुपये, सूर्यफुलास ६,८३५ रुपये भाव देण्यात आला. सोयाबीन, धने, बाजरी, दादर, ज्वारी असा एकूण १५ हजार क्विंटल माल खरेदी करण्यात आला. सायंकाळपर्यंत शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात येत होता. बाजार समितीतील व्यापारी व कर्मचारी वर्गाच्या सहकार्याने धान्य खरेदी- विक्रीची व्यवस्था सुलभ होते. शेतकऱ्यांच्या मालाला अधिकचा भाव कसा मिळेल, यासाठी संचालक मंडळाचा प्रयत्न असतो, असे प्रशासनामे म्हटले आहे. 

शेतकऱ्यांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आमचा मानस आहे. योग्य भाव आणि रोखीने पेमेंट यामुळे अमळनेर बाजार समितीत विविध तालुक्यातून आवक होते.  - तिलोत्तमा पाटील,   मुख्य प्रशासक, बाजार समिती, अमळनेर (जि.जळगाव)   

   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Irrigation Management : सिंचन व्यवस्थापन बदलत्या वातावरणाशी सुसंगत हवे

Cotton Disease : कपाशीच्या पिकात पातेगळ वाढली

E-Peek Pahani : ई-पीकपाहणीची अट रद्द करा

Raju Shetti : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजू शेट्टींचा मोठा धमाका; ऊस परिषदेचे करणार आयोजन

Crop Damage Compensation : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना भरपाईपोटी ९८७ कोटींची मदत

SCROLL FOR NEXT