32 crore fund received by untimely affected farmers in Nashik district
32 crore fund received by untimely affected farmers in Nashik district 
मुख्य बातम्या

नाशिक जिल्ह्यातील अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना ३२ कोटीचा निधी प्राप्त 

टीम अॅग्रोवन

नाशिक: ऑगस्ट-सप्टेंबर २०२१ मध्ये नाशिक जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.  जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३२ कोटी २९ लक्ष रुपयांची नुकसान भरपाई मदत प्राप्त झाली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात अवकाळी पावसाने नुकसान झाल्यानंतर भुजबळ यांनी जिल्ह्यात अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे विविध ठिकाणी नुकसानीची पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचमाने करून प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील नुकसानग्रस्त एकूण ८ तालुक्यातील शेतकऱ्यांना ३२ कोटी २९ लक्ष रुपयांचा निधी प्राप्त झाला असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.  तालुका निहाय प्राप्त निधी असा:  येवला तालुक्याला १५ कोटी २४ लक्ष, नांदगाव तालुक्याला १५ कोटी ७४ लक्ष, देवळा तालुक्याला ८३ हजार, सुरगाणा तालुक्याला ४ लक्ष ५६ हजार, त्र्यंबकेश्वर तालुक्याला ९५ हजार, इगतपुरी तालुक्याला ३ लक्ष १७ हजार, पेठ तालुक्याला ३ लक्ष ७१ हजार तर निफाड तालुक्याला १ कोटी १७ लक्ष रुपये असा एकूण नाशिक जिल्ह्यातील ८ नुकसानग्रस्त तालुक्यांना ३२ कोटी २९ लक्ष निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Karnataka Drought farmers : कर्नाटकातील शेतकऱ्यांना लवकरच दिलासा; दोन-तीन दिवसांत मिळणार दुष्काळाचे पैसे 

Monsoon 2024 : सलग अकरा महीने उष्णतेची| तीन नवीन ट्रॅक्टर बाजारात दाखल| राज्यात काय घडलं?

Jambhul Season : जांभळाचा हंगाम लांबल्याने जांभूळ पिकाला फटका

Crop Loan : पीक वाटपात विदर्भ आणि मराठवाड्याशी दुजाभाव का?

Land Survey : कोल्हापुरातील सहा तालुक्यांत जमिनींची ‘ई-मोजणी’ सुरू

SCROLL FOR NEXT