Tree planting scheme will be resumed in Parola
Tree planting scheme will be resumed in Parola 
मुख्य बातम्या

जळगाव जिल्ह्यात मतदारयाद्यांवर १५ हजार हरकती 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जळगाव जिल्ह्यात १ जानेवारी २०२२ या अर्हता तारखेवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमांतर्गत १६ नोव्हेंबरला जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभा झाल्या. त्यात १५ हजारांहून अधिक दावे व हरकती प्राप्त झाल्या आहेत. अजून काही दावे- हरकती घ्यावयाच्या असतील, तर शनिवारी (ता. २७) व रविवारी (ता. २८) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.  आता महापालिका, पालिका, नगर परिषद, नगरपंचायत क्षेत्रात प्रभागनिहाय मतदारयादींचे वाचन २६ नोव्हेंबरपर्यंत करण्यात येणार आहे. प्रभागात सध्या अस्तित्वात असलेली मतदारयादी प्रभागातील सर्व नागरिकांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ज्यांचे वय १ जानेवारी २०२२ ला १८ वर्षे पूर्ण होत आहे, तसेच ज्यांची नावे अद्याप मतदार यादीत नोंदविलेली नाहीत त्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येईल. नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासून दावे व हरकती सादर करता येतील. मृत, स्थलांतरित, दुबार, लग्न होऊन बाहेरगावी गेलेल्या महिला मतदारांची नावे वगळणीबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.  महत्त्वाच्या व्यक्तींचे नावे होणार चिन्हांकित  दिव्यांग, अतिमहत्त्वाच्या व्यक्‍तीची नावे मतदार यादीत चिन्हांकित करण्यात येणार आहेत. शहरी भागातील मतदारांनी प्रभागनिहाय यादी वाचनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Policy : धोरण विसंगतीने होतेय शेतकऱ्यांची माती

Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

Bogus Seed : सीमाभागात बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी तपासणी

Soil Conservation : ‘भूमी सुपोषण-संरक्षण’चा दीडशे गावांत संकल्प

Hapus Mango : सिंधुदुर्गातील बापर्डे येथे ६०५ ग्रॅमचा हापूस आंबा

SCROLL FOR NEXT