Cloudy weather prevails in Khandesh again 
मुख्य बातम्या

खानदेशात पुन्हा ढगाळ वातावरण कायम 

टीम अॅग्रोवन

जळगाव ः  खानदेशात पावसाळी व ढगाळ वातावरण पुन्हा तयार झाले आहे. यामुळे थंडी गायब झाली असून, कांदा, वेचणीवरील कापसाचे नुकसान होण्याची भीती आहे. कापसाची खेडा खरेदीदेखील थांबली आहे. गेले अनेक दिवस निरभ्र वातावरण नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता कायम आहे.  नोव्हेंबरमध्ये १८ तारखेला मध्यरात्रीनंतर खानदेशात अनेक भागात पाऊस झाला. यानंतर ढगाळ व पावसाळी वातावरण कायम झाले. दोन आठवडे ढगाळ वातावरण होते. यामुळे रब्बीतील पिकांना फटका बसला. कारण थंडीच नाही. नंतर २१ नोव्हेंबरला रात्रीदेखील अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जळगावमध्ये चोपडा, धरणगाव, जळगाव, एरंडोल, पाचोरा आदी भागात मध्यम पाऊस झाला. धुळ्यातही धुळे, शिरपूर भागात हलका ते मध्यम पाऊस झाला. गारपीट व अतिवृष्टी कुठेही झालेली नाही. पण या पावसाने रब्बीतील पिकांची पेरणी, केळीची काढणी, शेतात पडून असलेल्या चाऱ्याची वाहतूक रखडली आहे. नोव्हेंबरमध्ये फक्त २६ ते २८ असे तीन दिवस कोरडे वातावरण खानदेशात राहीले. नोव्हेंबरमध्ये पुन्हा २९ रोजी दुपारी ढगाळ वातावरण तयार झाले. तेव्हापासून आजपर्यंत म्हणजेच सोमवारपर्यंत (ता.६) ढगाळ वातावरण आहे. हिवाळा नावालाच आहे. पावसाळी वातावरणामुळे शेतकरी चिंतित आहेत.  रोज सकाळपासून ढगाळ, पावसाळी वातावरण राहते. या ढगाळ वातावरणामुळे कापसाची खेडा खरेदीदेखील होत नाही. कारण ही खरेदी उघड्यावर केली जाते. कापूस ट्रकमध्ये भरून वाहतूक केली जाते. यासाठी कोरडे वातावरण हवे आहे. कांदा पिकाचेदेखील अंशतः नुकसान होत आहे. बुरशीजन्य रोग सक्रिय होऊन पुढे भाजीपाला, केळी पिकात नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Palm Oil Prices : जागतिक बाजारात पामतेलाचे भाव वाढलेले; मलेशियाला होतोय फायदा

Soybean Cotton Madat : पहिल्या टप्प्यात ४६ लाख शेतकऱ्यांचं सोयाबीन, कापूस अनुदान जमा होण्याची शक्यता

Soybean Subsidy : सोयाबीन अनुदानासाठी आधार संमती पत्र भरून द्या; कृषी सहाय्यकांचं शेतकऱ्यांना आवाहन

Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कायदा, सुव्यवस्थेचा आढावा

Groundnut Harvesting : बोरपाडळे परिसरात भुईमूग काढणी सुरू

SCROLL FOR NEXT