रब्बी पेरणी तयारी सुरु
रब्बी पेरणी तयारी सुरु 
मुख्य बातम्या

पुणे विभागात रब्बी हंगामाची तयारी सुरू

sandeep navale

पुणे  ः गेल्या तीन महिन्यांत पुणे विभागात पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे विभागातील बहुतांशी धरणे भरली आहेत. रब्बी हंगामात पाण्याची अडचण येणार नसल्याने बहुतांशी शेतकऱ्यांनी रब्बीची तयारी सुरू केली आहे. हंगामात बियाण्यांची टंचाई भासू नये म्हणून एक लाख ७७ हजार १९९ क्विंटल बियाण्यांची मागणी पुणे कृषी विभागाने कृषी आयुक्तालयाकडे केली आहे. आयुक्तालयस्तरावरून मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पुरवठा करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले. यंदा जून, जुलै महिन्यात पावसाचा खंड पडल्याने बहुतांशी भागातील पिके वाया गेल्याने रब्बी हंगामात पेरणीचे क्षेत्र वाढणार असल्याचे चित्र आहे. त्यानुसार कृषी विभागाने तयारी करून बियाणे पुरवठा करण्याचे नियोजन सुरू केले आहे. शेतकऱ्यांना तालुका, गावपातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत बियाणे पुरवठा केला जाणार आहे. पुणे विभागात रब्बीचे सरासरी क्षेत्र सुमारे १८ लाख ७३ हजार ३९० हेक्‍टर आहे. हे क्षेत्र लक्षात घेत बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांचा विचार केल्यास ही मागणी अधिक आहे. २०१४-१५ मध्ये ८७ हजार ३ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. २०१५-१६मध्ये ६७ हजार ४६३ तर २०१६-१७ मध्ये एक लाख ५ हजार ९९६ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. सरासरी विचार केल्यास ८६ हजार ८२१ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती.

चालू वर्षी पुणे विभागात १८ लाख ६९ हजार ९८७ हेक्‍टरवर पेरणी होण्याची शक्‍यता आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे पोच होण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना ‘महाबीज’कडून एक लाख १५ हजार १०४ क्विंटल बियाण्यांचा पुरवठा करण्यात येणार आहे. खासगी कंपन्यांकडून ५३ हजार ९३४ क्विंटल; तर उर्वरित बियाणे राष्ट्रीय बीज निगम मंडळाकडून देण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disaster Relief Fund : रायगडमध्ये आपत्ती बचावासाठी हजार कोटी

Water Issue : शेतीसाठी ‘धनपूर’ धरणाच्या पाण्याची प्रतीक्षा

Orchard Planting : एक हजार हेक्टरवर सांगलीत फळबाग लागवड

Onion Market : कांदा उत्पादकांच्या डोळ्यात पुन्हा धुळफेक; सरकारने दिलेली ९९,१५० टन निर्यातीला परवानगी जुनीच

Fertilizer Demand : चोपडा तालुक्याला २७ हजार टन खतांची गरज

SCROLL FOR NEXT