lumpy vaccination  Agrowon
मुख्य बातम्या

Lumpy Virus : बारामती तालुका लंपी रोगमुक्ती कडे ; तालुक्यात ९६ टक्के लसीकरणाचा टप्पा पूर्ण

lumpy skin disease : पुणे जिल्ह्यातील अनेक जनावरांना लंपी रोगाची लागण झाली. यावर प्रतिबंधक उपाय म्हणून बारामती तालुक्यात १ लाख १६ हजार २३९ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ९६ टक्के लसीकरणाचा टप्पा पशुसंवर्धन विभागाने गाठला आहे.

Team Agrowon

Pune News : प्रतिबंधात्मक उपचार व प्रभावी लसीकरण यामुळे बारामती तालुका लम्पी स्कीन आजार मुक्तीकडे वाटचाल करू लागला आहे. बारामती तालुक्यात १ लाख १६ हजार २३९ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ९६ टक्के लसीकरणाचा टप्पा पशुसंवर्धन विभागाने गाठला आहे.

बारामती तालुक्यात सध्या तरी लम्पी स्कीनग्रस्त एकही जनावर नसल्याचे तालुका पशुसंवर्धन विभागाने सांगितले. मागील काही दिवसांपूर्वी शिर्सुफळ येथे तीन जनावरे बाधित आढळली होती. योग्य उपचारानंतर ही तीनही जनावरे रोगमुक्त झाली आहेत. तत्पूर्वी बारामती तालुक्यामध्ये मागील वर्षी लम्पी स्कीन या रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे यंदा पशुसंवर्धन विभाग प्रतिबंधात्मक उपायांबाबत अधिक काळजी घेत आहे.

तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना गोचीड, गोमाश्‍या निर्मूलनाबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी लसीकरण अद्याप झाले नाही अशा ठिकाणी बाधित जनावरे आढळल्यास निरोगी जनावरांपासून वेगळी ठेवणे, कोणत्याही संभाव्य रोगी जनावरास निरोगी जनावरांच्या कळपात प्रवेशास बंदी करणे, रोग प्रादुर्भाव झालेल्या भागातील बाधित व निरोगी जनावरांना चराऊ कुरणांमध्ये एकत्रित सोडण्यास मनाई करणे, डास, गोचीड, तत्सम किड्यांचा बंदोबस्त करणे, तसेच निरोगी जनावरांच्या अंगावर किडे न चावण्यासाठी औषध लावणे व गोठ्यामध्ये यासाठीच्या औषधांची फवारणी करणे, रोग प्रादुर्भाव क्षेत्रातील जनावरांना रोग प्रादुर्भाव नसलेल्या ठिकाणी तसेच स्थानिक बाजारामध्ये नेण्यास प्रतिबंध करणे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

‘शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचार केल्यास भरपाई अनुदान’

‘‘राज्य शासनाने लम्पी स्कीन रोगामुळे मृत्यू पावलेल्या जनावरांच्या पशुपालकांना प्रति जनावर ३० हजार रुपये नुकसान भरपाई अनुदान देण्याची घोषणा केली होती. हे अनुदान मिळवताना जनावरावर उपचार शासकीय पशू वैद्यकीय दवाखान्यामध्ये झालेले असावेत, असा निकष ठेवण्यात आला होता. मागील वर्षी बारामती तालुक्यामध्ये लम्पी स्कीन रोगामुळे १७० जनावरांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी १५६ जनावरांचे अनुदान संबंधित पशुपालकांना मिळाले. उर्वरित १४ जणांना त्यांची कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे नाकारले गेले. यापुढे देखील लम्पी स्कीनमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास संबंधित पशुपालकाने जनावरांवर शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यामध्ये उपचार केले असतील तर त्याला नुकसान भरपाई अनुदान देण्यात येणार आहे,’’ अशी माहिती बारामती तालुका पशुसंवर्धन विभागाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parliament Monsoon Session 2026: संसदेच्या आवारात विरोधक- सत्ताधारी आमने- सामने, लोकसभा, राज्यसभेचे कामकाज सलग चौथ्या दिवशी ठप्प

Marathwada Rain: मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत हलका ते दमदार पाऊस

Okra Farming: भुसावळात प्रसिद्ध मयूरभाऊंची भेंडी

Desi Cucumber Seeds: अनेक वर्षांपासून जोपासलेले देशी काकडीचे बियाणे

Protest Movement: दगडाहून कठोर हे सरकार

SCROLL FOR NEXT