Water supply Agrowon
मुख्य बातम्या

परभणी जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणार्थ १ कोटी ८९ लाखांची गरज

यंदाच्या एप्रिल ते जून महिन्यांत जिल्ह्यातील १८३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला.

टीम ॲग्रोवन

परभणी ; ‘‘यंदाच्या एप्रिल ते जून महिन्यांत जिल्ह्यातील १८३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईवर उपाययोजना कृती आराखडा जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा (Water supply) विभागातर्फे जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. त्यात २१८ उपाययोजनांचा समावेश आहे. त्यासाठी १ कोटी ८९ लाख १२ हजार रुपये निधीची गरज आहे’’, असे सूत्रांनी सांगितले.

एप्रिल ते जून या कालावधीत जिंतूर तालुक्यातील ३० गावे, सेलूतील ४२ गावे, गंगाखेडमधील ५९ गावे, पालमची ४७ गावे, पूर्णातील ५ गावे अशी पाच तालुक्यांतील १४३ गावे आणि ४० वाड्या, तांडे असे एकूण १८३ वस्त्यांवरील २ लाख ६७ हजार ४७४ लोकसंख्येला पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

त्यावर उपाययोजनांतर्गत तात्पुरत्या पूरक योजनांची ३१ कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी ९७ लाख रुपये निधी आवश्यक आहे. १८३ खासगी विहिरी, (Private wells) विंधन विहिरींच्या अधिग्रहणासाठी ८४ लाख १२ हजार रुपयांची गरज लागेल. गंगाखेड आणि पूर्णा तालुक्यातील प्रत्येकी दोन ठिकाणी टॅंकर, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा (Water supply) करण्यासाठी ८ लाख रुपयांची गरज आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT