Soybean Production Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Production : जगाचं सोयाबीन उत्पादन खरंच वाढणार का?

देशातील सोयाबीन हंगाम सुरु होऊन आता जवळपास दीड महिना होत आला. तसं पाहीलं तर यंदाचा हंगाम सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादकांसाठी आव्हानात्मकच ठरला.

अनिल जाधव

पुणेः सोयाबीन बाजार (Soybean Market) सध्या तेजीत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंडेच्या दरात (Soybean Rate) वाढ झाली. मात्र युएसडीएसह काही संस्था ब्राझील आणि अर्जेंटीनामधील सोयाबीन उत्पादन (Soybean Production) वाढण्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. त्यामुळे जागतिक सोयाबीन उत्पादनही वाढेल, असे सांगितले जात आहे.

देशातील सोयाबीन हंगाम सुरु होऊन आता जवळपास दीड महिना होत आला. तसं पाहीलं तर यंदाचा हंगाम सुरुवातीपासूनच सोयाबीन उत्पादकांसाठी आव्हानात्मकच ठरला. जून महिन्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या महत्वाच्या सोयाबीन उत्पादक राज्यांमध्ये पेरणीयोग्य पाऊस झाला नाही.

बहुतेक ठिकाणी पेरण्या जुलै महिन्यात झाल्या. त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात काही दिवस सलग पाऊस झाला. पीक ऐन फुलोऱ्यात असल्याने तेव्हापासून पिकाला फटका बसला. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सोयाबीन पीक काही दिवस पाण्याखाली होते.

मात्र यंदा पेरण्या उशीरा झाल्याचा काहीसा फायदाही झाल्याचं शेतकरी सांगत आहेत. कारण ऑक्टोबर महिन्यात सलग २० दिवस पाऊस झाला. नेमकं याच काळात वेळेवर पेरणी केलेले सोयाबीन काढणीला आले होते. या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सतत पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी सोयाबीनला कोंब आले. शेंगा सडल्या. दाणे काळे पडले होते. पण उशीरा पेरणी झालेल्या पिकाच्या काढणी आता सुरु आहे. त्यामुळे उशीराचं सोयाबीन पावसाच्या तडाख्यातून वाचलं. याचा मोठा दिलासा आता शेतकऱ्यांना मिळतो आहे.

जागतिक सोयाबीन उत्पादन कसं राहील?

युएसडीएने जगातील सोयाबीन उत्पादन वाढीचाही अंदाज व्यक्त केला आहे. मागील वर्षी जगात ३५२ दशलक्ष टन सोयाबीन उत्पादन झाले होते. ते यंदा ३९० दशलक्ष टनांवर पोचेल, असे युएसडीएने म्हटले आहे. म्हणजेच यंदा जागतिक सोयाबीन उत्पादन १० टक्क्यांनी वाढेल. मागील हंगामात जागतिक खाद्यतेल बाजार तेजीत आली होती. याचा फायदा सोयाबीनलाही मिळाला.

परिणामी दर तेजीत आले. ब्राझील, अमेरिका आणि अर्जेंटीना या देशातील शेतकऱ्यांना मागील वर्षभरात चांगला दर मिळाला. त्यामुळे यंदा ब्राझील आणि अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. यंदा अमेरिका आणि भारतातही सोयाबीन उत्पादन वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र अमेरिकेतील सोयाबीन पिकाला पाऊस आणि दुष्काळाचा फटका बसला. त्यामुळे उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमी राहीले.

सोयाबीन गाळप वाढेल का?

यंदा जागतिक सोयाबीन गाळपही यंदा अधिक राहण्याची शक्यता आहे. मागील हंगामात जगात ३१३.७ दशलक्ष टन सोयाबीनचे गाळप झाले होते. मात्र यंदा ते ३२७ दशलक्ष टनांवर पोचण्याचा अंदाज आहे. म्हणजेच सोयाबीन उत्पादन वाढीबरोबरच सोयाबीनचे गाळपही वाढणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT