Chana Rate Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा वाढेल का?

देशातील बाजारात नवा हरभरा दाखल झाल्यापासून दर दबावात आहेत. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमीच दर मिळाले. नाफेडनेही यंदा कमीच खेरदी केली.

टीम ॲग्रोवन

पुणेः देशात रब्बीची पेरणी (Rabi Sowing) आता सुरु झाली. मात्र नेमके याच काळात हरभरा दर (Chana Rate) दबावात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. याचा परिणाम हरभरा पेरणीवर (Chana Sowing) होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

देशातील बाजारात नवा हरभरा दाखल झाल्यापासून दर दबावात आहेत. शेतकऱ्यांना खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमीच दर मिळाले. नाफेडनेही यंदा कमीच खेरदी केली. त्यामुळे शतकरी अडणीत आले. परिणामी चालू रब्बी हंगामात हरभरा पेरणीवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यंदा देशात चांगला पाऊस झाला. त्यामुळे रब्बीच्या पेरणीसाठी पोषक वातावरण आहे.

देशात आता रब्बीच्या पेरण्या सुरु झाल्या. राज्यात तर उत्तर भारतात हरभरा पेरण्या होत आहेत. स्थिती पोषक असल्याने पेरण्या पुढील काही दिवसांमध्ये वेग घेण्याची शक्यता आहे. मात्र दिवाळीत हरभरा दर सुधारण्याचा अंदाज असूनही बाजार दबावात राहिल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. त्याचे पडसाद पेरणीवर दिसू शकतात.

सध्या नाफेड साठा कमी करण्यासाठी हरभऱ्याची विक्री करत आहे. त्यामुळे बाजार हरभऱ्याचा दबावातच आहे. त्यातच प्रक्रिया उद्योगाकडून उठाव कमी आहे. पुढे डाळ आणि बेसनला मागणी येतेय त्याप्रमाणात उद्योग हरभरा खरेदी करत आहे. त्यामुळे बाजारात मोठी खरेदी होत नाही. त्याचा दबाव दरावर आहे. तर नाफेडही बाजारात दर वाढणार नाही, याची दक्षता घेत विक्री करताना दिसतेय. नाफेडला नवा हरभरा खरेदी करण्यासाठी गोदामे रिकामी करायची आहेत. त्यामुळे नाफेडची खरेदी सुरुच राहील, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

परिणामी बाजारावर पुरवठ्याचा दबाव असल्याने हरभरा दरात फार मोठे चढ-उतार होताना दिसत नाहीत. सध्या बाजारात हरभऱ्याला प्रतिक्विंटल ४ हजार २०० ते ४ हजार ७०० रुपये दर मिळतोय. हरभरा परेणी कशी राहते? त्याचाही दबाव हरभरा बाजारावर येऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

Mechanical Paddy Transplanting: चिखलगावात यांत्रिक पद्धतीने भात लागवड

Onion Tomato Report: कांदा, टोमॅटोचा अहवाल १५ ऑगस्टपर्यंत सादर करा: पाशा पटेल समितीला निर्देश

SCROLL FOR NEXT