Kerala Fishermen
Kerala Fishermen Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

केरळमधील मासेमारांनी का पुकारला संप?

टीम ॲग्रोवन

इंधनाच्या वाढत्या किमतीविरोधात केरळमधील मत्स्य मेखला संरक्षण समितीने सोमवारी संपाची हाक दिली होती. या समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत केरळमधील समुद्राच्या जल क्षेत्रातील मासेमारी सोमवारी ठप्प करण्यात आली होती. इंधन दरवाढीचा परिणाम मासेमारी करणाऱ्यांवर होत असल्याचे या समितीचे म्हणणे आहे.

दिवसेंदिवस बदलत चाललेल्या हवामानाचा मासेमारीवर परिणाम होत असून मासळीचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळे या गंभीर समस्येतून मासेमारी करणाऱ्या बाहेर काढण्यासाठी आर्थिक पॅकेज जाहीर केले पाहिजे, अशी मागणी संघटना करत आहे.

या मागणीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी समुद्रातील काही भागांमधील मासेमारी ठप्प करण्यात आली होती. सरकारने मासेमारी करणाऱ्या जहाजासाठी २५ रुपये प्रति लिटर दराने रॉकेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटना करत आहे.

केरळ मत्स्य मेखला संरक्षण समितीने केवळ इंधन दरवाढीच्या विरोधातच हा संप पुकारला नव्हता तर केंद्र आणि राज्य सरकारच्या मासेमारी विरोधी धोरणांचाही विरोध करण्यासाठी हा संप पुकारण्यात आला होता.

या संपामध्ये 3,000 हून अधिक यांत्रिक मासेमारी करणारे जहाज आणि सुमारे 10,000 बोटी सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती ऑल केरळ फिशिंग बोट ओनर्स असोसिएशनचे सरचिटणीस जोसेफ झेवियर कालापुराकल यांनी दिली.

बदलते हवामान आणि इंधनाचे वाढते दर यामुळे मासेमारी कमी झाली आहे. त्यामुळे सरकारने तामीळनाडू सरकारप्रमाणे मासेमारी करणाऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणीही जोसेफ यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Vaccination : पावसाळ्यापूर्वी जनावरांचे लसीकरण करा

Summer Sowing : दुष्काळी छायेतही २४ हजार हेक्टरवर पेरा

Summer Sowing : यवतमाळच्या शेतकऱ्यांची उन्हाळी तिळाला पसंती

Onion Export Policy : अस्थिर कांदा धोरणांचे उमटणार राजकीय पडसाद

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

SCROLL FOR NEXT