Soybean Rate  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Rate : सोयाबीन बाजारात काय घडलं?

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील पाच दिवसांमध्ये जवळपास २० सेंटने सुधारले आहेत. सूर्यफुलाचे कमी झालेले दर आणि अमेरिकेचे जैव इंधनाचे धोरण, यामुळे सोयाबीन दर तुटले होते.

अनिल जाधव

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीन दर (Soybean Rate) काहीसे सुधारले होते. तर सोयातेल आणि सोयापेंडचे दर (Soymeal Rate) काहीसे स्थिर होते. मात्र देशात काही बाजारांमध्ये सोयाबीन दरात (Soybean Market Rate) काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. आज काही बाजारांमध्ये सोयाबीन दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयाने सुधारले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर मागील पाच दिवसांमध्ये जवळपास २० सेंटने सुधारले आहेत. सूर्यफुलाचे कमी झालेले दर आणि अमेरिकेचे जैव इंधनाचे धोरण, यामुळे सोयाबीन दर तुटले होते. मात्र चीनमधील काही शहरांमध्ये कोरोना निर्बंध शिथिल होत आहेत, तसेच अर्जेंटीनातील काही राज्यांमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान असल्याने सोयाबीनचा गेल्यावर्षीच्या तुलनेत माघारला आहे. याचा सकारात्मक परिणाम सोयाबीनच्या दरावर झाला आहे.

सोयाबीन दर एक डिसेंबरच्या १४.२५ डाॅलर प्रतिबुशेल्सवरून १४.४५ डाॅलरपर्यंत पोचले. अमेरिकेने जैव इंधन धोरणात सोयातेल वापर वाढविण्याचा निर्णय घेतल्यास सोयातेल आणि सोयाबीन दरात वाढ होऊ शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

आज देशातील बाजारात जवळपास २ लाख ६० हजार क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते, अशी माहिती व्यापारी आणि प्रक्रिया प्लांट्सनी दिली. गेल्या काही दिवसांपासून सोयाबीनचे दर दबावात आल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील आवकही कमी केली. आज काही बाजारांमध्ये सोयाबीन दर क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांनी सुधारले होते. आज देशात सरासरी ५ हजार २५० ते ५ हजार ६०० रुपयाने सोयाबीनचे व्यवहार झाले.

प्रक्रिया प्लांट्सेच दरही आज ५० ते १०० रुपयांनी वाढले होते. आज मध्य प्रदेशातील प्रक्रिया प्लांट्सचे दर प्रतिक्विंटल ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान होते. तर महाराष्ट्रातील दर ५ हजार ५०० ते ५ हजार ७५० रुपयांवर पोचले होते.

दर सुधारणार का?

सध्या आंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजार दबावात आहे. तसेच सोयाबीनमधील तेजीही टिकताना दिसत नाही. खाद्यतेलाचे दर सुधारण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास सोयाबीनलाही आधार मिळू शकतो.

त्यामुळे सध्या दबावात दिसत असलेले देशातील सोयाबीन दरही सुधारतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. सोयाबीनची दरपातळी चालू हंगामात किमान सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान राहू शकते, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar Crop Damage : अहिल्यानगर जिल्ह्यात पिकांचे पंचनामे सुरू

Maharashtra Agriculture : संकटातून बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार; महसूलमंत्री बावनकुळे

Sugarcane Price Dispute : ऊसदराचा निर्णय होईपर्यंत कारखाने बंद ठेवा;‘स्वाभिमानी’चा इशारा

Banana Crop Insurance : केळी विमाधारकांच्या परताव्याची मागणी

Drought Relief : दुष्काळसदृश स्थितीत पाणी, चारा, रोजगार हमीच्या उपाययोजनांना गती द्या; जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

SCROLL FOR NEXT