Watermelon Farming Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Watermelon Market: खानदेशात कलिंगड आवक घटली

Watermelon Price: खानदेशात सध्या कलिंगडाची आवक घटली आहे. आवक कमी असल्याने दर टिकून असून, दर्जेदार कलिंगडास प्रति किलो आठ ते १० रुपये दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेकऱ्यांना मिळत आहेत.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात सध्या कलिंगडाची आवक घटली आहे. आवक कमी असल्याने दर टिकून असून, दर्जेदार कलिंगडास प्रति किलो आठ ते १० रुपये दर जागेवर किंवा शिवार खरेदीत शेकऱ्यांना मिळत आहेत.

कलिंगडाची लागवड यंदा खानदेशात वाढली आहे. मागील किंवा खरिपात व लेट खरीप हंगामात पिकात रोगराई आल्याने अतोनात हानी झाली. एक ते दीड महिन्याचे पीक ऐन फळे लगडल्याच्या काळात हातचे गेले. कलिंगडाचा एकरी खर्च ६५ ते ७० हजार रुपये आहे. एवढा खर्च अनेकांचा वाया गेला. रब्बीत मात्र कलिंगड लागवड वाढली.

यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये लागवड कमी झाली तर डिसेंबरमध्ये लागवड अधिक झाली होती. डिसेंबरमध्ये लागवडीच्या कलिंगड पिकात काढणी पूर्ण झाली आहे. जानेवारीत लागवड कमी होती. अनेकांनी रमझान महिन्यातील बाजार लक्षात घेऊन केली होती. या क्षेत्रातील काढणी पूर्ण झाली आहे. यामुळे या महिन्यात कलिंगडाची खानदेशात आवक फारशी नाही.

या महिन्यात लागवडही बंद आहे. पुढेही कलिंगड आवक कमी राहील. मागील वर्षी डिसेंबर, जानेवारीत मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर खानदेशात कलिंगडाची लागवड झाली होती. सध्या खानदेशात कलिंगडाची आवक प्रतिदिन १०० टन एवढीदेखील नाही. यामुळे दर टिकून आहेत. खरेदीदार थेट शिवारात जावून पाहणी करीत आहेत. शेतकऱ्यांशी संपर्क साधून विक्रीचे नियोजन व अपेक्षा जाणून घेत आहेत.

डिसेंबरमध्ये आठ हजार हेक्टरवर लागवड

यंदा डिसेंबरमध्ये खानदेशात सुमारे आठ हजार हेक्टरवर लागवड झाली होती. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारमधील तळोदा व शहादा तालुका आघाडीवर होता. कमाल शेतकऱ्यांनी रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करून घेऊन लागवड पूर्ण केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT