Watermelon Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Watermelon Arrival: खानदेशात कलिंगड आवक कमी असूनही दर अस्थिर

Fruit Market Update: खानदेशात सध्या कलिंगडाची आवक अल्प आहे. आवक कमी असल्याने दर टिकून राहतील, असा अंदाज होता. पण दर अस्थिर असून, सात ते १२ रुपये प्रतिकिलोचा दर दर्जानुसार कलिंगडास शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात सध्या कलिंगडाची आवक अल्प आहे. आवक कमी असल्याने दर टिकून राहतील, असा अंदाज होता. पण दर अस्थिर असून, सात ते १२ रुपये प्रतिकिलोचा दर दर्जानुसार कलिंगडास शिवार खरेदीत शेतकऱ्यांना मिळत आहे.

कलिंगडाची लागवड खानदेशात सुरूच आहे. मागील किंवा खरिपात व लेट खरीप हंगामात पिकात रोगराई आल्याने अतोनात हानी झाली. एक ते दीड महिन्याचे पीक ऐन फळे लगडल्याच्या काळात हातचे गेले.

कलिंगडाचा एकरी खर्च ६५ ते ७० हजार रुपये आहे. एवढा खर्च अनेकांचा वाया गेला. पण रब्बीत लागवड वाढली आहे. खानदेशात कलिंगड लागवड सुमारे सात हजार हेक्टरवर झाली आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील लागवड साडेपाच हजार हेक्टरपेक्षा अधिक आहे.

यंदा सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये, डिसेंबर व जानेवारीतही लागवड कमी झाली आहे. पुढेही लागवड सुरू राहील. आवक सुरू झाली आहे. कलिंगडाची आवक फेब्रुवारीत बऱ्यापैकी सुरू होईल, अशी स्थिती आहे.

मागील वर्षी डिसेंबर, जानेवारीत मिळून सुमारे अडीच हजार हेक्टरवर खानदेशात कलिंगडाची लागवड झाली होती. लागवडीत जळगाव जिल्ह्यातील जामनेर, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, धुळे, नंदुरबारातील तळोदा व शहादा तालुका आघाडीवर होता. यंदा मात्र सर्वत्र लागवड वाढत आहे. फेब्रुवारीतही लागवड बऱ्यापैकी होईल.

यंदा कलिंगड बियाण्याची मागणी अधिक असल्याने त्याची जादा दरात विक्री, टंचाई असे प्रकारही झाले आहे. बियाणे, खतांची दरवाढ झाल्याने खर्चही वाढला आहे. अशात शेतकरी किमान ११ ते १२ रुपये दर जागेवर मिळावा, अशी अपेक्षा करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT