Betel Leaf Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Betel Leaf : खाऊच्या पानांच्या दरात पंधरा दिवसांत दोन वेळा वाढ

Betel Leaf Rate : पानमळ्यांसाठी पोषक वातावरण असल्याने फुटवा आणि पानांचा आकारही वाढीस मदत होत आहे.

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : पानमळ्यांसाठी पोषक वातावरण असल्याने फुटवा आणि पानांचा आकारही वाढीस मदत होत आहे. पानांच्या पेठात खाऊंच्या पानांची मागणी वाढली असून अपेक्षित उठावही होत आहे. त्यामुळे पानांच्या दरात प्रतिडागाला २०० ते ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांत दोन वेळा दर वाढल्याने पान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यंदाच्या हंगामातील खाऊच्या पानांची विक्री मार्चपासून सुरू झाली. या दरम्यान, वेलींना फुटवा कमी असतो त्यामुळे पानांची संख्याही कमी असते. यामुळे बाजारात आवक कमी होती. परंतु या दरम्यान, चेन्नईतील विजयवाडा, चिन्नूर, कुण्णुर या भागांतील पानांची आवक राज्यातील पानांच्या पेठेत होत असल्याने दरही कमी मिळतात.

गेल्या पंधरा दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील मिरज पूर्व भागातील पानांची आवक हळूहळू वाढू लागली आहे. तर विजयवाडा, चिन्नूर, कुण्णुर या भागांतील पानांची आवक कमी झाल्याने मे च्या दुसऱ्या आठवड्यात पानांच्या दरात वाढ झाली होती. मे महिन्यात प्रतिडागास ६०० ते १५०० रुपयांनी दर वाढून प्रतिडाग १००० ते ४५०० रुपयांपर्यंत पोहोचले.

वाढत्या उष्णतेचा फटका पानमळ्यांना बसला होता. गेल्या आठवड्यापासून वातावरणात बदल होऊ लागला आहे. त्यामुळे वेलींना अपेक्षित फुटवे आणि पानांचा आकारही वाढू लागला आहे. जून महिना सुरू झाला की फाफडा पानांची काढणी सुरू होते. फाफडा पान प्रामुख्याने गुजरात येथे विक्री होते.

त्यामुळे सध्या गुजरात येथून या पानांची मागणी वाढली आहे. तसेच कळी, फाफडा, हक्कल प्रकारच्या पानांना मुंबई, पुणे, नाशिक, रत्नागिरी, गुजरात, लातूर, धाराशिव, पंढरपूर आदी भागांतील पानांच्या पेठेत मागणी असते. सध्या कळी आणि फाफडा या दोन प्रकारच्या पानांची विक्री सुरू झाली आहे.

गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पानांच्या पेठेत खाऊच्या पानांची मागणी वाढू लागली असून उठावही होत आहे. त्यामुळे पानांचे दर प्रतिडाग २०० ते ५०० रुपयांनी वाढले आहेत. गेल्या पंधरा दिवसांत दोन वेळा पानांच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिसाला मिळाला आहे. कळी कळी पानांना एक डागाला (एका डागात १२ हजार पाने) १२०० ते ५५०० रुपये तर फाफडा पानाला एका डागाला (एका डागात १२ हजार पाने) २५०० ते ५००० रुपये आणि हक्कल पानाला (एका डागात १२ हजार पाने) ६०० ते १३०० रुपये असा दर मिळत आहे.

पानमळ्याला पोषक वातावरण असल्याने पानांची चांगली वाढ होत आहे. पेठेत पानांना मागणी वाढली असल्याने दरात वाढ झाली आहे. हंगामाच्या प्रारंभापासून अपेक्षित दर मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे.
- भाऊसो नागरगोजे, पान उत्पादक शेतकरी, नरवाड, जि. सांगली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT