Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market: हळदीतील तेजीमुळे लागवड वाढण्याचा अंदाज

Team Agrowon

Market Trend: देशात सध्या हळदीचे भाव वाढले आहेत. सध्या कमी असलेले लागवड क्षेत्र आणि उत्पादन घटीच्या अंदाजामुळे हळद तेजीत आहे. वायद्यांमध्ये भावात जास्त वाढ दिसते. हळदीचे भाव पुढील काळातही तेजीत राहण्याचा अंदाज आहे. भावातील तेजीमुळे हळदीची लागवड वाढण्याची शक्यताही असल्याचं जाणकारांनी सांगितले. 

बदलते वातावरण, पावसाची दडी आणि एक महिनाभरापुर्वी दबावात असलेले भाव यामुळे हळद लागवड कमी होती. त्यातच मागील दोन वर्षे हळद उत्पादकांना चांगला भाव मिळाला नव्हता. त्यामुळे चालू हंगामातील लागवड कमीच राहील, असा अंदाज होता.

निर्यातीसाठीही चांगली मागणी होती. देशातही उठाव वाढला. यामुळे हळदीचे भाव तेजीत आले. मे महिन्यात हळद ५ हजार ते ५ हजार ५०० रुपयांवर होती. त्यातच टप्प्याटप्प्याने वाढ होत गेली. सध्या देशभरातील बाजारांमध्ये हळदीला प्रतिक्विंटल सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० रुपये भाव मिळत आहेत.

हळद वायद्यांमध्ये मागील तीन आठवड्यांमध्ये मोठी वाढ झाली. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात हळदीचे वायदे ७ हजार २०० रुपयांवर होते. त्यात वाढ होत गेली. हळदीची लागवड कमी झाली तसे वायदे वाढत गेले.

देशातील एनसीडीईएक्स प्लॅटफाॅर्मवर ऑगस्टचे वायदे सायंकाळी १० हजार ६० रुपयांवर होते. तर ऑक्टोबरचे वायदे १० हजार ६२० रुपयांवर होते. वायद्यांप्रमाणेच एनसीडीईएक्सच्या स्पाॅटमध्येही निजामाबाद केंद्रावर ८ हजार ९३० रुपये भाव होता.  

जाणकारांच्या मते दोन कारणांनी हळदीचे भाव वाढत आहेत. पहिले म्हणजे मार्च आणि एप्रिल महिन्यात महत्वाच्या हळद उत्पादक भागात जोरदार पाऊस आणि काही भागात गारपीट झाली. यामुळे शेतात उभ्या असलेल्या पिकाला फटका बसला.

तर जून महिन्यात महाराष्ट्र आणि कर्नाटकातील हळद उत्पादक भागात पाऊस नव्हता. मराठवाड्यातही हळदीच्या पट्ट्यात पाऊस खूपच कमी आहे. याचा परिणाम हळद लागवडीवर होऊ शकतो.

तर इरोड भागात सतत पाऊस आहे. या सर्व कारणांमुळे हळदीचे नुकसान झाले. गुणवत्तेवरही परिणाम झाला. पाऊस लागल्याने अनेक भागातील हळदीचा रंग बदलला. परिणामी गुणवत्तापूर्ण हळदीच्या भावात तेजी आली. 

व्यापारी आणि जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, एक आठवड्यापुर्वी देशातील हळद लागवड २० ते २५ टक्क्यांनी कमी राहण्याचा अंदाज होता. पण भावात आलेल्या तेजीमुळे शेतकरी हळद लागवडीकडे वळू शकतात.

तमिळनाडू आणि कर्नाटकात शेतकरी पुन्हा हळदीच्या लागवड करत असल्याचे चित्र आहे. जुलै महिन्याच्या मध्यापर्यंत हळदीची लागवड होऊ शकते. त्यामुळे सध्याचे भाव पाहता शेतकरी लागवड वाढवू शकतात, असा अंदाज दिसतो, असे जाणकारांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT