Turmeric Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : हळदीच्या वायदे बाजारातील भाव विक्रमी पातळीवर; तेजी टिकून राहण्याचा अंदाज 

Turmeric Rate : देशातील बाजारात हळदीच्या भावात चांगली वाढ झाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे घटलेली लागवड, कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीच्या भावाला आधार मिळत आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील बाजारात हळदीच्या भावात चांगली वाढ झाली आहे. यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे घटलेली लागवड, कमी उत्पादन आणि चांगली मागणी यामुळे हळदीच्या भावाला आधार मिळत आहे. तर वायद्यांमध्ये हळदीच्या भावाने आतापर्यंतचा विक्रमी टप्पा पार केला. तसेच हळदीचे भाव पुढील काळातही तेजीतच राहतील, असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. 

यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे देशातील हळद लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात कमी झाले. हळद लागवड यंदा जवळपास ३० टक्क्यांनी घटली आहे. त्यातच पीक वाढीच्या काळात महत्वाच्या उत्पादक भागांमध्ये पाऊस कमी होता. तर जास्त तापमान आणि बदलत्या वातावरणाचाही फटका हळद पिकाला बसला. त्यामुळे हळदीच्या उत्पादनात यंदा घट होण्याची शक्यता आहे. सध्या देशातील अनेक भागात हळद काढणी सुरु झाली. त्यामुळे हळद लागवडीत नेमकी किती घट येत आहे हे पुढे येत आहे. त्याचाही परिणाम आपल्याला हळदीच्या बाजारावर दिसून येत आहे.

देशात आता मराठवाडा विभागात हळद क्षेत्र चांगलेच विस्तारले आहे. त्यामुळे देशाच्या हळद बाजाराचे लक्ष मराठवाड्यातील हळद पिकाकडे असते. यंदा मराठवड्यातील हळद काढणीला उशीर होत आहे. याचा परिणाम हळदीच्या उत्पादनावर दिसून येत आहे. या भागातील हळद आता कुठे बाजारात दाखल होत आहे. त्यातही हळद उत्पादनात घट दिसून आली.

महाराष्ट्रासह इतर राज्यातील बाजारांमधील हळदीची आवकही सरासरीपेक्षा कमीच दिसून येत आहे. धरमपुरी, कर्नाटक आणि इरोड भागातील बाजारातील आवक अपेक्षेपेक्षा कमीच असल्याचे व्यापारी सांगत आहेत. बाजारातील आवक कमी असली तरी हळदीला उठाव चांगला आहे. त्यामुळे हळदीच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. 

निर्यात-आयात कमी

जगात भारत हळद निर्यातीत महत्वाची भुमिका पार पाडतो. मात्र देशातील भाव जास्त असल्याने हळदीच्या निर्यातीत घट झाली आहे. तर आयातही २५ टक्क्यांनी कमी राहील्याचे सुत्रांनी सांगितले. 

बाजार समित्यांमधील भावपातळी

देशातील बाजार समित्यांमध्ये हळदीच्या भावात चांगली तेजी आली आहे. मागील चार आठवड्यांमध्येच भावात १० टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे व्यापार सांगित आहेत. सध्या बाजारात हळदीला सरासरी १३ हजार ते १७ हजार रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. तर बाजारातील आवक कमीच आहे. 

वायद्यांमध्ये विक्रम

देशातील एनसीडीईएक्स म्हणजेच वायदे बाजारात हळदीच्या भावाने आतापर्यंतचा विक्रमी टप्पा गाठला. हळदीने आज १९ हजार ५८० रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा गाठला होता. भाव उच्चांकी पातळीवर गेल्यानंतर पुन्हा काहीसे नरमले. पण भावाने आज आतापर्यंतचा विक्रमी टप्पा गाठला होता. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: शेवगा भाव नरमले; सोयाबीन स्थिरावले, कापसात चढ उतार, केळीचे दर टिकून तर गवार तेजीतच

PM Kisan Yojana: अर्थसंकल्पात 'पीएम किसान'साठी किती तरतूद?; २२ वा हप्ता 'या' तारखेला मिळू शकतो

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसीतील चुकीमुळे लाभ बंद झालेल्या महिलांसाठी दिलासा! शासन फेरपडताळणी सुरू करणार

Ambeohol Dam Project Issue: आंबेओहळ प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचे भिजत घोंगडे

Union Budget 2026: काजू, नारळावर भर; शेतकऱ्यांसाठी ठोस धोरण नाही

SCROLL FOR NEXT