Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market : तुरीचे दर साडेअकरा हजार पार

Tur Rate : आठवडाभरात तुरीचा दर साडेअकरा हजार पार गेला आहे. शुक्रवारी (ता. ५) येथील बाजारात किमान ९००० व कमाल ११ हजार ७४५ रुपये दर मिळाला.

 गोपाल हागे

Akola News : बाजारात तुरीच्या दर्जेदार मालाची कमतरता निर्माण झाल्याने दरात तेजी आली आहे. आठवडाभरात तुरीचा दर साडेअकरा हजार पार गेला आहे. शुक्रवारी (ता. ५) येथील बाजारात किमान ९००० व कमाल ११ हजार ७४५ रुपये दर मिळाला. सरासरी १०८०० रुपयांचा दर होता, तर वाशीम जिल्ह्यात कारंजा बाजार समितीत कमाल दर १२ हजारापर्यंत पोचला आहे.

मार्चअखेरचे व्यवहार आटोपल्याने बाजार समित्या पूर्वपदावर येऊ लागल्या आहेत. नव्या आर्थिक वर्षाची सुरवातच तुरीच्या दरातील वाढीने झाली आहे. गेले काही दिवस साडे दहा ते अकरा हजारांपर्यंत अडकलेला दर पाचशे ते सहाशे रुपयांनी वाढला आहे. कारंजा बाजार समितीत कमाल दराने १२ हजारांचा पल्ला गाठला.

दर वाढण्यामागे चांगल्या मालाची कमी प्रमाणात आवक हे प्रमुख कारण आहे. मार्चपर्यंत बाजारात मिश्र स्वरूपाच्या मालाची आवक झाली. आता ३० टक्केच माल दर्जेदार आहे. उर्वरित ७० टक्के माल दुय्यम आहे. यामुळे चांगला माल आता भाव मिळवू लागल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

डाळीसाठी लागणारी दर्जेदार तूर कमी प्रमाणात येत आहे. चांगल्या देशी तुरीचा तुटवडा हे दरवाढीच्या तेजीमागील प्रमुख कारण आहे. आवकही कमी होत आहे. मागणी अधिक असताना माल मिळत नसल्याने उद्योग जगताकडेही पूर्वीचा स्टॉक शिल्लक राहिलेला नाही. यामुळे दरात तेजी आल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

तुरीच्या दरात हा हंगाम सुरू होताच जानेवारीनंतर घसरण सुरू झाली होती. सरासरी दर आठ ते साडेआठ हजारांपर्यंत पोचला होता. या वर्षात तुरीचे अपेक्षित उत्पादन आलेले नाही. काही शेतकऱ्यांनी तुरीची साठवणूक केली होती. आता दर वाढू लागल्याने हा माल बाहेर निघण्याची शक्यता आहे. या स्थितीचा थेट तुरीच्या दराला फायदा होत आहे.

तूर दर स्थिती (प्रतिक्विंटल)

अकोला बाजार समिती

किमान-९०००

कमाल-११७४५

सरासरी-१०८००

मलकापूर बाजार समिती

कमाल-११४२५

किमान-९३००

सरासरी-१०३९५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Antyodaya Scheme: अहिल्यानगरमधील २७ लाखांहून अधिक लाभार्थ्यांना अन्नधान्याचा लाभ

Drought Relief: दुष्काळग्रस्त शेतकरी, मजुरांना तातडीने मदत द्या : बाळासाहेब थोरात

Orange Damage: मृगबहार संत्राफळांचे नुकसान

Soybean Prices: हमीदरापेक्षा भाव वाढले, उत्पादन मात्र घटले

Leopard Attack: बिबट्याचा धुमाकूळ, पंढरपुरात १३ कोकरे, करमाळ्यात ५ मेंढ्या फस्त

SCROLL FOR NEXT