Tur Procurement Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Procurement : ‘नाफेड’च्या पाच शासकीय केंद्रांवर तूर खरेदीचा प्रारंभ नाही

Tur Market : तुरीची हमीदराने खरेदी करण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या २१ पैकी अमरावती, चांदूरबाजार, धारणी, खल्लार व नेरपिंगळाई या पाच केंद्रांवर अद्याप खरेदीच सुरू होऊ शकलेली नाही.

Team Agrowon

Amaravati News : तुरीची हमीदराने खरेदी करण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या २१ पैकी अमरावती, चांदूरबाजार, धारणी, खल्लार व नेरपिंगळाई या पाच केंद्रांवर अद्याप खरेदीच सुरू होऊ शकलेली नाही. नोंदणीच्या वेळी पोर्टलवर पीकपेरा सादर करताना झालेल्या चुकांमुळे खरेदीचा घोळ झाल्याचे कारण यामागे दिले जात आहे.

खरिपातील नगदी पीक असलेल्या तुरीला खुल्या बाजारात हमीदरापेक्षा कमी दर असल्याने शासनाने ‘नाफेड’च्या माध्यमातून हमीदराने शासकीय खरेदी १३ फेब्रुवारीपासून प्रारंभ केली आहे. राज्यभरात एकूण उत्पादनाच्या पंचवीस टक्के तूर खरेदी करण्यात येणार आहे. अमरावती जिल्ह्यासाठी ३९ हजार ६५४ टन तूर खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

त्यासाठी विदर्भ मार्केटिंगची १२ व जिल्हा मार्केटिंगची नऊ, अशी एकूण २१ केंद्रे तयार करण्यात आली. या सर्व केंद्रांवर २४ जानेवारीपासून नोंदणी प्रारंभ झाली असून आतापर्यंत ९ हजार १२३ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. आठ एप्रिलपर्यंत नोंदणीची प्रक्रिया चालणार आहे.

शेतकऱ्यांना खरेदीसाठी संदेश पाठविण्यात येत असून ही प्रक्रिया १६ केंद्रांवर सुरू आहे. अमरावती, चांदूरबाजार, धारणी, खल्लार व नेरपिंगळाई या पाच केंद्रांवर अद्याप खरेदीची प्रक्रिया प्रारंभ झालेली नाही.

शेतकऱ्यांना नोंदणी करताना पीकपेरा द्यावा लागतो. पोर्टलवर नोंदणी करताना तुरीचे क्षेत्र सोयाबीन किंवा कापसासोबत आहे हे स्पष्ट न दिसल्याने खरेदीचे संदेश देता आलेले नसल्याचे कारण सांगण्यात आले. या चुका आता दुरुस्त करण्यात आल्या असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करण्याची प्रक्रियाही प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, जिल्ह्यातील ९ हजार १२३ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून आतापर्यंत (एक एप्रिल) १ हजार ७८३ शेतकऱ्यांची २६ हजार ६४९ क्विंटल तूर हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. १६ केंद्रांवर ही खरेदी सुरू असून ती अतिशय संथगतीने होत आहे.

काही केंद्रांवर संदेश मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांनी तूर विक्रीसाठी आणली नसल्याचे सांगण्यात आले. सद्यःस्थितीत खुल्या बाजारात तुरीला ७ हजार २३२ रुपये प्रति क्विंटल सरासरी दर मिळत आहे. जिल्ह्यातील उर्वरित १६ केंद्रांवर १७८३ शेतकऱ्यांची तूर हमीदराने खरेदी करण्यात आली आहे. १५ मे पर्यंत ही खरेदी चालणार असून आठ एप्रिल ही नोंदणीची अखेरची मुदत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT