Tur Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Price : दबावात असलेल्या तुरीच्या दरात सुधारणा

Market Update : गेल्या आठवड्यात तुरीचे दर दबावात गेले होते. तुरीला हमीभाव ७५५० रुपयांचा असताना बाजारात मात्र ६००० ते ७००० असा दर तुरीला मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Amravati News : गेल्या आठवड्यात तुरीचे दर दबावात गेले होते. तुरीला हमीभाव ७५५० रुपयांचा असताना बाजारात मात्र ६००० ते ७००० असा दर तुरीला मिळत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. आता मात्र तुरीच्या दरात सुधारणा अनुभवली जात असून, अमरावती बाजार समितीत तुरीने ७००० ते ७५०० रुपयांचा टप्पा गाठला आहे. अचलपूर बाजार समितीत आवक वाढती असून, या ठिकाणी तुरीचे दर दर्जानुसार ७००० ते ८२०० रुपयांवर पोहोचले होते.

राज्यात सर्वदूर हंगामातील नव्या तुरीची आवक होण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांची तूर बाजारात येताच ओलाव्याचे कारण देत तुरीचे दरात एक हजार ते १५०० रुपयांपर्यंतची घसरण नोंदविण्यात आली. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत तुरीचे दर ९००० रुपयांवर होते. त्यापूर्वी एप्रिल २०२४ मध्ये, तर तुरीच्या दरांनी १२ हजार रुपयांपर्यंतची उंची गाठली होती. त्यामुळे दरातील ही तेजी कायम राहील, अशी अपेक्षा व्यक्‍त केली जात असताना दर थेट सहा हजार रुपयांपर्यंत खाली आले.

परिणामी, शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अमरावती बाजार समितीचा विचार करता सध्या नव्या तुरीची आवक जेमतेम ३५ क्‍विंटल इतकी आहे. नव्या तुरीला ७००० ते ७५०० रुपयांचा दर मिळत आहे. कारंजा (वाशीम) बाजार समितीत मात्र ओलाव्याआड नव्या तुरीचे दर दबावात होते. या ठिकाणी ६४७५ तर ओलाव्याचे प्रमाण कमी असलेल्या तुरीला ८३६५ रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळाला.

अमरावतीच्या तुलनेत या ठिकाणी आवक ११०० क्‍विंटल इतकी होती. यवतमाळ बाजार समितीत देखील तुरीला अपेक्षित दर मिळाला नाही. या ठिकाणी ६४८० ते ७८९५ रुपये असा तुरीला दर होता. मंगळवारी (ता. ६) यवतमाळ बाजारात तूर ६३०० ते ६८९५ रुपये क्‍विंटल होती. त्यानंतर दरात काही अंशी सुधारणा नोंदविली गेली.

चांदूरबाजार (अमरावती) बाजारात नवीन तुरीचे व्यवहार ७२०० ते ७७८७ रुपये क्‍विंटलने होत आहेत. या बाजारात देखील मंगळवारी (ता. ६) तूर ७००० ते ७३५० रुपये क्‍विंटल होती. त्यानंतर दोनच दिवसांत तुरीच्या दरात सुधारणा झाली आहे. शेगाव (बुलडाणा) बाजाराचा विचार करता या ठिकाणी आवक जेमतेम २५ क्‍विंटल होती. या बाजारात तुरीला ६००० ते ७९०० रुपये क्‍विंटलचा दर मिळाला.

अकोला बाजारात हमीभावापेक्षा कमी

राज्याच्या काही बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात सुधारणा होत असताना अकोला बाजार समितीत मात्र तुरीचे दर दबावात होते. या ठिकाणी तुरीला ५१०० ते ८४७५ रुपये क्‍विंटलला दर मिळाला. तुरीची आवक ८२२ क्‍विंटल इतकी सरासरी नोंदविली जात आहे.

अचलपूर बाजार समितीत सध्या तुरीची आवक वाढत आहे. नव्या हंगामातील तुरीची रोजची आवक सरासरी तीन हजार पोत्यांवर पोहोचली आहे. धारणी, मेळघाट भागांतून ही आवक होत असून, स्थानिक शेतकरीदेखील तूर विक्रीसाठी आणत आहेत. सध्या दर्जानुसार तुरीला ७००० ते ८२०० रुपये प्रति क्‍विंटल असा दर मिळत आहे. यापुढील काळात तुरीच्या दरात आणखी तेजीची शक्‍यता आहे.
राजेंद्र गोरले, सभापती, बाजार समिती, अचलपूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT