Tur Cultivation Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Cultivation: खानदेशात तूर लागवड घटणार

Khandesh Agriculture Update: खानदेशात यंदा तूर लागवड घटणार आहे. पूर्वहंगामी लागवड सुरू झाली आहे. यंदा तुरीखालील क्षेत्रात सुमारे ४० ते ५० टक्के घट होईल, असा अंदाज आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News: खानदेशात यंदा तूर लागवड घटणार आहे. पूर्वहंगामी लागवड सुरू झाली आहे. यंदा तुरीखालील क्षेत्रात सुमारे ४० ते ५० टक्के घट होईल, असा अंदाज आहे.मागील हंगामात सुमारे १६ हजार हेक्टरवर झाली होती. मागील वेळेस लागवड वाढली होती. जळगाव जिल्ह्यात सुमारे ११ हजार हेक्टवर तूर पीक होते. मागील दोन वर्षे तूर लागवड सतत वाढली. अनेकांनी सोयाबीनमध्ये आंतरपीक म्हणून तूर लागवड केली होती. कापूस पिकातही तुरीचे आंतरपीक होते.

मागील दोन वर्षे तूर दर टिकून राहिले. कमी व अधिक पावसातही तूर पीक हाती आले. त्यातून चाराही आला व जमीन सुपीकतेलाही मदत झाली. शिवाय अन्य पिकांच्या तुलनेत खर्च कमी लागला. कापूस पीक खर्चिक बनले आहे. मजूर, किडनाशके आदींचा मोठा खर्च कापसावर करावा लागतो.

यामुळे तूर लागवडीत वाढ झाली होती. परंतु यंदा तुरीचे दर कमी होते. उत्पादन बरे आले. पण दर अल्प होते. यामुळे नफा कमी झाला. यंदा अनेक जण लागवड कमी करतील, असे दिसत आहे. जळगाव जिल्ह्यात सुमारे चार ते पाच हजार हेक्टरवर लागवड होईल, असे दिसत आहे.

तुरीसाठी खानदेशात जळगावातील मुक्ताईनगर, रावेर, बोदवड, जामनेर हा भाग प्रसिद्ध आहे. तसेच अन्य भागात कापूस पिकात तूर लागवड असते. धुळ्यातील धुळे, शिंदखेडा, नंदुरबारातील नवापूर, नंदुरबार भागातही तूर लागवड बऱ्यापैकी असते. पण यंदा तुरीखालील क्षेत्रात सुमारे ४० ते ५० टक्के घट होईल, असा अंदाज आहे. पण पूर्वहंगामी तूर लागवड रावेर, यावल, चोपडा भागात सुरू आहे. अनेकांनी संकरित, संशोधित तूर वाणांची लागवड केली आहे. काही तूर वाणांचा खानदेशात तुटवडादेखील आहे.

तूर आवक २०२३ मध्ये कमी होती. त्यामुळे दर अखेरपर्यंत टिकून राहीले. दर्जेदार तुरीला १० हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंतचा दर मिळाला होता. पण आता तूर दर कमी आहेत. यामुळे तूर लागवड यंदा कमी होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT