Tur Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Tur Market Rate : खानदेशात तूर दर ८५०० रुपयांवर

खानदेशात तुरीचे दर ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत.

Team Agrowon

Tur Market Update Jalgaon : खानदेशात तुरीचे दर (Tur Rate) ८५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले आहेत. दरात मागील १५ दिवसांत सुधारणा झाली आहे. मध्यंतरी तूर दर किमान ६२०० व कमाल ७००० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. बाजार समित्यांत अत्यल्प म्हणजेच रोज २०० ते २५० क्विंटल आवक (Tur Arrival) होत आहे.

जळगाव जिल्ह्यात फक्त अमळनेर, चोपडा, मुक्ताईनगर व चाळीसगाव बाजार समितीत तुरीची आवक होत आहे. धुळ्यात शिरपूर आणि नंदुरबारात नंदुरबार बाजारात आवक होत आहे. खानदेशात सध्या रोज मिळून ६३० क्विंटलपर्यंत तुरीची आवक होत आहे.

त्यात अमळनेर येथील बाजारात आठवड्यातून तीन ते चार वेळेस प्रतिदिन सरासरी १५० क्विंटल आवक होत आहे. चोपडा येथील बाजारातही आठवड्यात मिळून १५० ते २०० क्विंटल तुरीची आवक होत आहे.

अशीच स्थिती शिरपूर, नंदुरबार बाजार समितीत आहे. खानदेशात तुरीची मुख्य पीक म्हणून फक्त मुक्ताईनगर, रावेर, चाळीसगाव, धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर भागात काही शेतकरी लागवड करतात. नंदुरबारात नवापूर, नंदुरबार भागातही काही भागात तुरीची मुख्य पीक म्हणून लागवड केली जाते.

कमाल शेतकरी कापूस पिकात किंवा बांधानजीक तुरीची लागवड करतात. रावेर, मुक्ताईनगर भागातील शेतकरी बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे तूर विक्रीसाठी नेतात. यामुळे जळगाव, मुक्ताईनगर, जामनेर येथील बाजारात तुरीची आवक अपवादानेच होते. अमळनेर, शिरपूर व नंदुरबार येथे मात्र तूर लिलाव व्यवस्थित होतात.

चुकारेदेखील रोखीने मिळतात, यामुळे अनेक शेतकरी या बाजारांत तूर विक्रीसाठी नेतात. काही शेतकऱ्यांनी गावातच तुरीची विक्री केली आहे. सध्या दरात सुधारणा दिसत आहे, परंतु सर्व शेतकऱ्यांना या दरांचा लाभ होत नसल्याची स्थिती आहे. कारण शेतकऱ्यांकडील तुरीची कमाल विक्री झाली आहे. सध्या व्यापाऱ्यांतही व्यवहार होत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT