Hapus Mango Market Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Hapus Mango Market : हापूसच्या पाच डझनाच्या पेटीला साडेतीन हजार रुपये

वातावरणातील बदलांमुळे यंदा हंगामाच्या मध्यात हापूसची आवक कमीच राहिली आहे. त्यामुळे सध्या कोकणातून मुंबईतील वाशी बाजारात अवघा १७ हजार पेटीच आंबा पाठविला आहे.

Team Agrowon

Mango Market वातावरणातील बदलांमुळे (Climate Change) यंदा हंगामाच्या मध्यात हापूसची आवक (Hapus Arrival) कमीच राहिली आहे. त्यामुळे सध्या कोकणातून मुंबईतील वाशी बाजारात अवघा १७ हजार पेटीच आंबा पाठविला आहे.

आवक कमी असल्याने बाजारातील दर पाच डझनच्या पेटीला साडेतीन हजार रुपये आहे. तर आंबा कमी असल्यामुळे कॅनिंगचे (प्रक्रिया उत्पादनांसाठीचा आंबा) दर वधारलेले असून किलोला ५० ते ६० रुपये आकारले जात आहेत.

वातावरणाने दगा दिल्यामुळे यावर्षी हापूसचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेले आहे. कोकण कृषी विद्यापीठाच्या अहवालानुसार १५ टक्केच उत्पादन शेवटपर्यंत हाती येणार आहे.

एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून आंबा कमी झाला. त्याचा परिणाम सर्वांत मोठ्या वाशी बाजारपेठत दिसून आला. ऐन हंगामात म्हणजेच मार्च महिन्यात ५० हजारांपर्यंत प्रतिदिन आंबा पेटी कोकणातून जात होती.

ती ३५ हजारांपर्यंत आली. अक्षयतृतीयेला यंदा सर्वांत कमी नोंद झाली. ही घट अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी (ता. २८) वाशीला कोकणातून १७ हजार पेट्या गेल्या आहेत. कर्नाटकसह अन्य राज्यांतून येणाऱ्या आंब्याच्या पेट्यांची संख्या ६५ हजारांवर आहे. त्याच आंब्याचे कोकणच्या हापूसपुढे आव्हान आहे.

हापूसच्या दर्जेदार फळाच्या पाच डझनाच्या पेटीला साडेतीन हजार रुपये दर मिळतोय. उर्वरित छोट्या फळांना त्यापेक्षा कमी दर मिळत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा हापूसचा दर पाचशे रुपयांनी अधिक आहे.

दरम्यान, प्रक्रिया उद्योगांसाठी लागणारा आंबा कमी असल्याने दर वधारलेले आहेत. गतवर्षी कॅनिंगसाठीचा आंबा प्रति किलो ३० ते ३५ रुपयांनी खरेदी केला जात होता. यंदा हाच आंबा सुरुवातीला ५० ते ०६ रुपये किलोने खरेदी केला जात आहे. १० मे नंतर आंब्याची आवक वाढेल, अशी शक्यता आहे.

हापूसची आवक अजूनही कमी आहे, त्यामुळे दर स्थिर आहेत. आवक १० मे नंतरच वाढेल. तोपर्यंत अन्य राज्यातून येणाऱ्या आंब्याची आवकही कमी राहील. त्यामुळे हापूसचा दर जैसे थे राहील.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार
प्रक्रियेसाठी लागणारा माल अपुरा आहे. त्यामुळे कॅनिंगचे दरही अधिक आहे. कच्चा माल कमी असल्यामुळे प्रक्रिया उत्पादनाचे दर दहा ते वीस टक्क्यांनी वाढतील.
- प्रसन्न पेठे, आंबा बागायदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Watermelon Sales Decline: टरबूज विक्रीवर मुंबईतील घटनेचे सावट

Farm Roads: वर्षानुवर्षे बंद असलेले ‘शिवरस्ते’ झाले मोकळे

Monsoon 2026: यंदा मॉन्सून दगा देणार?; 'एल निनो'मुळे खरीप पीक उत्पादन घटणार, 'आयसीएआर'च्या अभ्यासातून चिंता व्यक्त

Crop Insurance Compensation: पीकविमा भरपाईचे ३३६ कोटी तातडीने वाटप करा : जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

Farm Pond Lining: शेततळ्याचे अस्तरीकरण कसे करावे; अस्तरीकरणासाठी शासनाकडून अनुदान किती?

SCROLL FOR NEXT