Turmeric
Turmeric  Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Turmeric Market : देशातील हळद विक्रीचा हंगाम आटोपल्यात जमा

अभिजित डाके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Sangli News : देशातील महत्त्वाच्या हळद बाजारपेठांतील हळद विक्रीचा हंगाम आटोपला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हळदीचे दर टिकून आहेत. बाजारात प्रतवारीनुसार हळदीला प्रतिक्विंटल १६ हजारांपासून ते १८ हजार रुपये असा दर आहे.

मराठवाडा आणि इरोड या बाजारपेठेत हळद विक्री सुरू आहे. मराठवाड्यातील हळद विक्री काही दिवसांत उरकण्याची शक्यता असून इरोड बाजारात वर्षभर हळद विक्री होते. त्यामुळे येत्या महिनाभर हळदीच्या दरात फारसे चढ-उतार होण्याची चिन्हे नसल्याचा अंदाज हळद उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला.

देशात प्रामुख्याने हळद विक्रीचा हंगाम मार्चपासून मे अखेर असा तीन महिन्यांचा कालावधी असतो. या दरम्यान, हळदीच्या दरात अनेक वेळा चढ-उतार होतात. त्यामुळे शेतकरी हळद विक्री करताना आवक आणि दराची परिस्थिती पाहूनच विक्री करतात. गेल्या तीन ते चार वर्षांत हळदीचे दर सरासरी ८ हजार रुपयांपर्यंत होते. त्यामुळे शेतकरी हळद विक्री थांबवतात. परिणामी देशात शेतकरी आणि व्यापाऱ्यांकडे २५ ते ३० लाखांपेक्षा अधिक पोती विक्रीची असतात.

गतवर्षी कमी पावसामुळे हळदीची लागवड कमी झाल्याने उत्पादन ५५ ते ६० लाख पोत्यांचे झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे मुळात गतवर्षीचा हळद विक्रीचा हंगाम सुरू झाल्यापासून हळदीचे दर तेजीत राहिले. बाजारपेठेतील हळदीची आवक आणि दराची स्थिती पाहूनच शेतकऱ्यांनी हळदीची विक्री करण्यास सुरवात केली. त्यामुळे बाजारात आवक कमी आणि मागणी अधिक असल्याने हळदीच्या दरात दुप्पट वाढ झाली. त्यामुळे हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला.

देशातील बाजारपेठेत दररोज ५०० ते १००० पोत्यांची आवक सुरू आहे. मराठवाड्यातील नांदेड, हिंगोली, बसमत, वाशीम, रिसोड आणि हिंगोलीत हळद विक्री सुरू आहे. इरोडमध्ये वर्षभर हळदीची विक्री होते. गतवर्षी या भागात शेतकऱ्यांनी हळदीची फारशी लागवड केली नाही. इरोड बाजारात दररोज २००० हजार पोत्यांची आवक होते. विक्री हंगाम सुरू झाल्यापासून हळदीच्या दरात फारशी तेजी-मंदी झाली नाही. त्यामुळे दर टिकून आहेत. या महिन्यातही हळद दरात फारसे चढ-उतार होण्याची शक्यता नाही.

प्रतवारीनुसार हळद दर (प्रतिक्विंटल)

महिना ः एप्रिल २०२४

लगडी ः २१ ते २२ हजार रुपये

पावडर क्वॉलिटी ः १७ ते १७५०० रुपये

मध्यम ः १७ ते १७५०० रुपये

उच्च प्रतिची ः १९ ते २१ हजार रुपये

मे २०२४

पावडर क्वॉलिटी ः १७,२०० ते १८०००

कणी ः १६ ते १६५००

मध्यम ः १८,२०० ते १८,५००

जून २०२४

मध्यम ः १७,५०० ते १८२००

कणी ः १६,००० ते १६५००

पावडर क्वॉलिटी ः १६५०० ते १७५००

देशातील हळद विक्रीचा हंगाम जवळपास संपला आहे. दर टिकून आहेत. मागणीही चांगली आहे. सध्या हळद विक्रीला येत असली तरी, फारशी आवक नाही. येत्या काळात हळद दरात फार मोठी तेजी-मंदी येणार नाही.
- गोपाळ मर्दा, हळद व्यापारी, सांगली.
गेल्या हंगामात उत्पादन कमी असल्याने हळद दरात वाढ झाली. त्यामुळे उत्पादकांना फायदा झाला. आर्थिक नुकसान भरून निघण्यास थोडी मदत झाली. शासनाने हळदीला हमीभाव जाहीर करावा. दर निश्चित झाल्याने शेतकऱ्यांना फायदा होईल.
- राजेंद्र गायकवाड, हळद उत्पादक, भुईंज, सातारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update : खानदेशात काही भागांत जोरदार; अनेक मंडलांत तुरळक पाऊस

Crop Insurance Scheme : पीकविमा योजनेत १५ जुलैपूर्वी सहभाग घ्या

Ashadhi Wari 2024 : माऊलींच्या पादुकांचे शाही स्नान संपन्न; तुकोबांची पालखी बारामतीतून पूढे मार्गस्थ

Crop Insurance : पीकविमा मदतीच्या मुद्यावर कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन

Water Storage : मराठवाड्यात वाढेना पाणीसाठा

SCROLL FOR NEXT