Soybean Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

Government Procurement : केंद्र शासनाच्या किमान हमीदरानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या प्रति हेक्टर खरेदी संदर्भात कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४-२४ साठी सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : केंद्र शासनाच्या किमान हमीदरानुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या प्रति हेक्टर खरेदी संदर्भात कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४-२४ साठी सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यात राज्यात सातारा जिल्ह्याची उत्पादकता सर्वाधिक २६ क्विंटल, कोल्हापूर जिल्ह्याची २३ क्विंटल जाहीर झाली आहे. तर सर्वांत कमी गडचिरोली जिल्ह्याची ६.५६ जाहीर झाली आहे. या उत्पादकतेनुसार शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना सोयाबीन देता येईल.

केंद्र शासनाच्या किमान हमी दरानुसार राज्यात २५५ ठिकाणी सोयाबीन, उडीद व मुगाची खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. यात नाफेड व एनसीसीएफ या केंद्रीय नोडल एजन्सीकडून एसएलएने (स्टेट लेव्हल एजन्सी) नेमलेल्या विविध संस्थांकडून ही केंद्रे सुरू झाली आहेत. उडीद व मुगाची खरेदी १० ऑक्टोबरपासून, तर सोयाबीनची खरेदी १५ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहेत. यासाठी शेतकऱ्यांना खरेदीपूर्वी ऑनलाइन नोंदणी एक ऑक्टोबरपासून सुरू झाली. शासकीय खरेदी केंद्रांवर शेतीमाल खरेदी करण्यासाठी कृषी विभागाकडून हेक्टरी मर्यादा निश्‍चित केली जाते.

यंदाही कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४-२०२४ चा सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे. यात हेक्टरी उत्पादकतेत सातारा जिल्हा २६ क्विंटल जाहीर झाल्याने तो राज्यात अव्वल ठरला आहे. तर त्या खालोखाल कोल्हापूर २३ क्विंटल, अहिल्यानगर १९ क्विंटल जाहीर झाला आहे. राज्यात सर्वांत कमी ६.५६ क्विंटल उत्पादकता गडचिरोली जिल्ह्याची जाहीर झाली आहे. या उत्पादकतेनुसार शेतकऱ्यांना प्रतिहेक्टर मर्यादेत सोयाबीन शासकीय खरेदी केंद्रांवर विक्री करता येणार आहे.

जिल्हानिहाय जाहीर झालेली उत्पादकता (क्विंटल/हेक्टरी)

नाशिक १३.९५, धुळे १४.५०, नंदुरबार १४.९९, जळगाव १०, अहिल्यानगर १९, पुणे १३, सोलापूर १२.२३, सातारा २६, सांगली १९.०७, कोल्हापूर २३, छत्रपती संभाजीनगर ११.५०, जालना १३, बीड ९.५०, लातूर १२.३०, धाराशिव १६.५०, नांदेड १३, परभणी १५, हिंगोली १४, बुलडाणा १५, अकोला १४.५०, वाशीम १६.७०, अमरावती १८, यवतमाळ १४.३१, वर्धा १२, नागपूर ११, भंडारा ११, चंद्रपूर १५, गडचिरोली ६.५६.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Vidhansabha Election Result 2024 : लातूर,धाराशिवकरांची महायुतीला पसंती

SCROLL FOR NEXT