Sugar Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Export Update : साखर निर्यातीला परवानगीची शक्‍यता मावळली

Sugar Production : यंदा साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा घटल्याने केंद्राने दुसऱ्‍या टप्प्‍यातील साखर निर्यातीला परवानगी देण्याचा विचार सोडून दिला आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugar Market Export : यंदा साखर उत्पादन अपेक्षेपेक्षा घटल्याने केंद्राने दुसऱ्‍या टप्प्‍यातील साखर निर्यातीला परवानगी देण्याचा विचार सोडून दिला आहे. कमी साखर उत्पादन पर्यायाने स्‍थानिक किरकोळ बाजारात किमतीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.

अशातच जर साखर निर्यातीला परवानगी दिली तर साखरेचे किरकोळ बाजारातील दर आवाक्याबाहेर जाण्‍याची भीती आहे. यामुळे केंद्राने सरत्या हंगामातील दुसऱ्या टप्प्‍यातील साखर निर्यातीला अघोषित स्‍थगिती दिली आहे. पुढील हंगामापर्यंत तरी केंद्राकडून साखर निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता धूसर असल्याचे केंद्रीय सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र, कर्नाटकाकडून अपेक्षाभंग

यंदा हंगाम सुरू होण्‍यापूर्वी गेल्‍या वर्षी आघाडीवर असणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक आदी राज्‍यांकडून यंदा साखर उद्योगाला मोठ्या अपेक्षा होत्या. या राज्‍यात जर चांगली साखर निर्मिती झाली तर देशाचे साखर उत्पादन वाढेल, असा कयास होता.

पण यंदा सुरुवातीपासूनच ही राज्ये साखर उत्पादनात पिछाडली. शेवट पर्यंत या राज्यांमध्ये अपेक्षित साखर उत्पादन वाढले नाही, याचा साहजिकच नकारात्मक परिणाम देशाच्या साखर उत्‍पादनावर झाला.

जादा उत्पादनाच्या अंदाजामुळे यंदा ही गेल्‍या वर्षी इतकी साखर निर्यात होऊन त्याचा फायदा साखर कारखानदारांना मिळेल, असा अंदाज होता. मात्र सगळेच गणित बिघडले. उत्तर प्रदेशात गेल्या वर्षीइतकेच उत्पादन अपेक्षित होते. उत्‍तर प्रदेशात गेल्‍या वर्षीच्या व यंदाच्या साखर उत्पादनात फारसा फरक पडला नाही.

पण या दोन राज्यांतील कमी साखर उत्पादनामुळे मात्र निर्यात धोरणावरच फरक पडला आहे. महाराष्ट्र व कर्नाटकात ही राज्ये निर्याती बाबतीतही आघाडीवर आहेत. यामुळे निर्यातीस परवानगी नसल्‍याचा फटका या दोन्ही राज्‍यांना बसला आहे.

कमी उत्पादनाचे चित्र स्पष्‍ट झाल्याने केंद्राची नकार घंटा

यंदा साखर कारखान्यांनी केंद्राने दिलेल्या मुदती अगोदरच साखर निर्यातीचे करार केले. केंद्राने साठ लाख टन निर्यातीची परवानगी दिल्यानंतर दोन महिन्यांतच साखर कारखानदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटून निर्यातीला परवानगी देण्याबाबत मागणी केली होती. त्यावेळी हंगाम मध्यावर सुरू असल्‍याने श्री. शहा यांनी उत्पादन पाहून निर्यातीला परवानगी देण्याचे आश्वासन दिले होते.

पण त्या नंतर मात्र सातत्‍याने उत्पादनात घटच होत गेली. केंद्राने साखर उत्‍पादनाचा आढावा घेत आहोत, असे सांगत वेळ मारुन नेली. आता देशातील हंगाम जवळ जवळ संपला आहे. साखर उत्पादन गेल्‍या वर्षीच्या तुलनेत कमी होणार हे चित्र ही स्पष्ट झाले आहे. अशा वातावरणात केंद्र नव्या निर्यातीला परवानगी देईल, असे वाटत नसल्याची प्रतिक्रिया साखर उद्योगातील तज्ज्ञांची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Google AI In Agri : गुगलकडून भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती, आरोग्य आणि शिक्षणासाठी ८ दशलक्ष डॉलर्सची घोषणा

Manikrao Kokate Arrest Warrant: माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी, कुठल्याही क्षणी अटक

Crop Damage Compensation: अतिवृष्टीला चार महिने उलटूनही मदत मिळेना!

Agriculture Technology: शाश्‍वत शेतीसाठी थर्मल सेन्सर्स

Samruddhi Agri Navnagar: समृद्धी कृषी नवनगर उपसमितीची बैठक घ्या

SCROLL FOR NEXT