Sugar Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Sugar Season: पुढील साखर हंगाम आशादायी

Sugar Production: देशाचा यंदाचा साखर हंगाम कमी उत्पादनाचा गेला असला तरी ऊस लागवडीत वाढ झाल्याने पुढील हंगामात मात्र पुरेशा साखर उत्पादनाची अपेक्षा इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News: देशाचा यंदाचा साखर हंगाम कमी उत्पादनाचा गेला असला तरी ऊस लागवडीत वाढ झाल्याने पुढील हंगामात मात्र पुरेशा साखर उत्पादनाची अपेक्षा इंडियन शुगर अँड बायो-एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने (इस्मा) व्यक्त केली आहे.

यंदाचा सरता हंगाम साखर उद्योगाच्या दृष्टीने कठीण गेला. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात तर घट झालीच पण उत्पादन घटल्याने साखर कारखानेही पुरेशा क्षमतेने सुरू राहू शकले नाहीत. यामुळे अनेक कारखान्यांना अपेक्षित साखर उत्पादन करता आले नाही, परिणामी व्यवस्थापन खर्चात वाढ झाली.

यंदाचा हंगाम अगदी शेवटच्या टप्प्यावर आला आहे. उत्तर प्रदेशातील वीस साखर कारखाने वगळता अन्य राज्यांतील गळीत हंगाम पूर्णपणे संपला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे साखर सुमारे ६० लाख टनांनी कमी होण्याचा अंदाज आहे. सध्याचे गाळप पाहता तो खराही ठरत आहे.

या पार्श्‍वभूमीवर पुढील हंगाम (२०२५-२६) उद्योगासाठी दिलासा देणारा ठरेल, असा आशावाद ‘इस्मा’ने व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण चांगले असल्याने उसाच्या लागवडी वाढल्या आहेत. हवामान खात्यानेही दमदार मॉन्सूनची शक्यता व्यक्त केल्याने यंदा उसाची वाढ चांगली होईल, अशी शक्यता आहे. याचा सकारात्मक परिणाम पुढील हंगामावर होणार आहे. सध्याच्या प्राथमिक अंदाजानुसार येणारा हंगाम ऑक्टोबरला म्हणजे वेळेतच सुरू होईल, अशी शक्यता ‘इस्मा’ने व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक या आघाडीच्या राज्यांमध्ये पुढील वर्षासाठी लागवडी वाढल्या आहेत. भारतीय हवामान विभागासह अन्य संस्थांनी येणारा पावसाळी हंगाम सामान्य असेल, अशी शक्यता वर्तवली आहे. यामुळे सध्या वाढीच्या अवस्थेतील उसाला पावसाळ्यात चांगले पाणी मिळेल व त्याचा अनुकूल परिणाम उसाच्या वाढीवर होऊ शकतो, असे ‘इस्मा’च्या सूत्रांनी सांगितले.

दक्षिण कर्नाटक, तमिळनाडूत विशेष हंगामाची शक्यता

दक्षिण कर्नाटकात व तमिळनाडूतील काही कारखाने आपला विशेष हंगाम जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सुरू करण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी उसाच्या लागवडी फारशा झालेल्या नसल्याने या भागातील हंगाम लवकर संपला होता. सध्या मात्र कर्नाटकात पुरेशा प्रमाणात ऊस उपलब्ध आहे.

यामुळे पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाल्यानंतर कारखाने विशेष हंगामाला सुरुवात करतील, असेही ‘इस्मा’च्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. हा विशेष हंगाम मुख्य हंगामाआधी सुरू झाल्यास एकूण उत्पादनात चार ते पाच लाख टन साखरेची वाढ होऊ शकते. उसाची चांगली वाढ झाल्याने ऊस उत्पादक राज्यामधील उसाची रिकव्हरीही वाढेल, अशी अपेक्षा ‘इस्मा’ची आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT