Edible Oil Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Edible Oil Import Duty : खाद्यतेल आयात शुल्कवाढीचा फायदा शेतकऱ्यांऐवजी उद्योजकांनाच

Market Update : खाद्यतेल आयात शुल्कात केलेल्या वाढीमुळे सोयाबीन दरात तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत होती. प्रक्रिया उद्योजकांनी स्वहित जपत खाद्यतेल दरात वाढ केली. याउलट आयात शुल्क वाढीचा परिणाम दरावर झाला नाही.

Team Agrowon

Nagpur News : खाद्यतेल आयात शुल्कात केलेल्या वाढीमुळे सोयाबीन दरात तेजी येईल, अशी अपेक्षा व्यक्‍त होत होती. प्रक्रिया उद्योजकांनी स्वहित जपत खाद्यतेल दरात वाढ केली. याउलट आयात शुल्क वाढीचा परिणाम दरावर झाला नाही.

या विषयात केंद्राने हस्तक्षेप करीत सोयाबीन उत्पादकांना दिलासा द्यावा, अशी मागणी मध्य प्रदेशातील किसान संघाचे नेते अर्जुन पाटीदार यांनी केली.

केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांना लिहिलेल्या पत्रातून पाटीदार यांनी ही मागणी निवेदनाद्वारे केली आहे. त्यात म्हटले आहे, की देशात मध्य प्रदेश हे सोयाबीन उत्पादकतेत आघाडीवर आहे.

गेल्या काही वर्षांत नैसर्गिक कारणांमुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होत असल्याने चिंता वाढली आहे. एकीकडे सोयाबीनची उत्पादकता कमी होत असताना नव संशोधित बियाणे व तंत्रज्ञान देण्याची गरज आहे.

त्याकडेही सरकारचे दुर्लक्ष होत आहे. या वर्षी केंद्राने सोयाबीनला ४८९२ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. परंतु देशातील एकाही बाजारात सोयाबीनला हा दर मिळालेला नाही. त्यावरूनच स्थिती गंभीर असल्याचे सिद्ध होते, असेही निवेदनात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Fishermen Compensation: पूरग्रस्त मत्स्य व्यावसायिकांना चार कोटींची भरपाई मंजूर

CPIM Protest: बीड जिल्ह्यात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निदर्शने

Crop Loan Rates: पीकनिहाय कर्जदर निश्चित

Sugarcane Payments Pending: साखर कारखान्यांकडे अडकले शेतकऱ्यांचे ८७६ कोटी रुपये

Jowar Prices Low: ज्वारीला कमी दर; शेतकरी आर्थिक अडचणीत

SCROLL FOR NEXT