Grape Export Agrowon
मार्केट इन्टेलिजन्स

Grape Export : कमी साखरेच्या द्राक्ष माल निर्यातीचा मुद्दा पुन्हा समोर

जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात हंगामाला गती येत आहे. मात्र या पार्श्‍वभूमीवर या कामकाजादरम्यान साखर उतरण्याच्या अवस्थेतील द्राक्षे कमी साखर असताना निर्यात होत असल्याबद्दल तक्रारी होत्या.

Team Agrowon

नाशिक : जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात (Grape Export) हंगामाला गती येत आहे. मात्र या पार्श्‍वभूमीवर या कामकाजादरम्यान साखर उतरण्याच्या अवस्थेतील द्राक्षे कमी साखर असताना निर्यात होत असल्याबद्दल तक्रारी होत्या.

या बाबत काही निर्यातदारांकडे (Grape Exporter) थेट पाहणी करून द्राक्ष मालात साखरेचे प्रमाण कमी असल्याचे आढळले.

१५ ब्रिक्सखालील माल काढणी (Grape Harvesting) करून निर्यात होत असल्याचे समोर आले. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारच्या ‘ॲगमार्क’ कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी कृषी विभागासमवेत पाहणी करत गुणवत्तेचे निकष पाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.

द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही निर्यातदार द्राक्षमण्यात १६ ब्रिक्सखाली साखरेचे प्रमाण असताना माल काढणी करून निर्यात करत होते.

याबाबत महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाकडून गैरप्रकार रोखण्यासाठी निर्यातसंबंधी शासकीय यंत्रणांना पत्रव्यवहार केला होता.

यासंबंधी विपणन व निरीक्षण महासंचालनालयाच्या ‘ॲगमार्क’च्या अधिकारी सोनाली बागडे यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.

युरोपियन देशांमध्ये भारतीय द्राक्षांना दरवर्षी मागणी असते. सुरुवातीच्या टप्प्यात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने चांगला दर मिळतो.

त्यामुळे काहीजण मिळेल तो माल पाठविण्याची घाई करतात. परिणामी, मालात साखरेचे प्रमाण कमी असल्यास तो माल आयातदारांकडून नाकारण्याचे प्रकार घडतात.

द्राक्ष उत्पादकांना त्याचा फटका बसतो. त्यामुळे निर्यातदारांना निर्यातीचे निकष पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मंगळवारी (ता. २४) महाराष्ट्र राज्य बागायतदार संघ येथे झालेल्या बैठकीत देखील हा मुद्दा चर्चेत आला. त्यातही निकष पाळण्याबाबत सूचना देण्यात आल्या.

नियम हवेत, अडवणूक नको

द्राक्ष निर्यात प्रक्रियेत आयातदार देशांच्या निकषांप्रमाणे कामकाज होण्यासाठी द्राक्षासंबंधी प्रमाणीकरण यंत्रणांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन होणे गरजेचे आहे. मात्र एखादी चुकीची कारवाई झाल्यास हंगामात अडचणी येण्याची शक्यता आहे.

त्यामुळे निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती शेतकरी, निर्यातदारांनी व्यक्त केली. त्यामुळे ‘नियमाप्रमाणे कामकाज व्हावे; मात्र त्यात अडवणूक नको’ असा त्यांचा सूर दिसून आला.

अपेक्षित प्रमाणापेक्षा कमी साखर उतरलेला द्राक्ष माल निर्यात होत असल्याचे तपासणीदरम्यान आढळून आले. हे प्रमाण कमी असल्यास वजनावर देखील परिणाम होतो. गुणवत्तेचे कामकाज व्हावे. कुणाचेही नुकसान व्हायला नको. मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.

- सोनाली बागडे, अधिकारी, ॲगमार्क

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Food: विविधतेचा बळी देऊन सपाटीकरण कशासाठी?

Agricultural Culture: शेती पद्धती बदलण्याची तीव्र निकड

Gay Gotha Scheme: गायी-म्हशींसाठी गोठा बांधण्यास २.३१ लाखांपर्यंत अनुदान; जनावरांच्या संरक्षणासाठी सरकारची योजना

Rural Farmer Issue: ग्रामीण महाराष्ट्र कर्जबाजारी का होत आहे?

Soybean Farming: सोयाबीन पिकावर वाढू शकतो रोगांचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT